पद्माराजे महिला संघटनेतर्फे पोलीस अधीक्षकांना राखी बांधून ऋतज्ञता व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:21+5:302021-08-23T04:25:21+5:30
कोल्हापूृर : कोरोना महामारीची परिस्थती असो अगर महापूर, राजकीय नेत्यांचा दौरा असो अगर आंदोलन नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात राहून नागरिकांचे ...
कोल्हापूृर : कोरोना महामारीची परिस्थती असो अगर महापूर, राजकीय नेत्यांचा दौरा असो अगर आंदोलन नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात राहून नागरिकांचे संरक्षण करत कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस कौशल्याने पार पाडतात. अहोरात्र कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांप्रति भावना व्यक्त करण्यासाठी शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्ष सरिता सासणे यांनी अधीक्षक बलकवडे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी पोलीस बांधवांनाही राखी बांधून बंधन घट्ट केले. पोलीस दल कोल्हापुरातील नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहील, असे अभिवचन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी भगिनींना दिले. यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या उपाध्यक्ष आरती वाळके, गीता डाकवे, सरिता सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो नं. २१०८२०२१-कोल-डीएसपी, राखी
ओळ : नागरिकांच्या सुरक्षेसाठी, अहोरात्र बंदोबस्तासाठी रस्त्यावर राहिलेल्या पोलिसांप्रति भावना व्यक्त करण्यासाठी पद्माराजे महिला संघटनेने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.
220821\22kol_2_22082021_5.jpg
ओळ : नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र बंदोबस्तासाठी रस्त्यावर राहीलेल्या पोलिसांप्रती भावाना व्यक्त करण्यासाठी पद्माराजे महिला संघटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून ऋतज्ञता व्यक्त केली.