वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षांना मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:03+5:302021-09-04T04:28:03+5:30
कोल्हापूर : पंधरा वर्षांवरील रिक्षा पासिंगला मुदतवाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक ...
कोल्हापूर : पंधरा वर्षांवरील रिक्षा पासिंगला मुदतवाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन दिले.
कोरोना संसर्गाच्या सलग दोन लाटा आणि महापुरामुळे कोल्हापुरातील रिक्षाचालक अक्षरश: मोडकळीस आला आहे. त्यामुळे मुदतबाह्य झालेल्या रिक्षांचे चालक पुन्हा नव्याने उभारण्यासाठी नवीन रिक्षा खरेदी करू शकत नाही. त्यामुळे याच रिक्षांना पासिंग करण्यासाठी २०२४पर्यंतची मुदतवाढ द्यावी. जेणेकरून केंद्र शासनाच्या नव्या पाॅलिसीचा आम्हा रिक्षाचालकांना लाभ होईल. यासह २००८पासून बंद करण्यात आलेले रिक्षा बॅच आम्हाला द्यावेत, अन्यथा त्यासाठी घेतलेली रक्कम परत करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांच्याकडे केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकरलाल पंडित, अरिफ गार्दी, महेश जाधव, शिवाजी सूर्यवंशी, महादेव गायकवाड, विजय तोरस्कर आदी उपस्थित होते.
फोटो : ०३०९२०२१-कोल-रिक्षा
आेळी : पंधरा वर्षांवरील रिक्षांना मुदतवाढ देऊन त्यांचे पासिंग करावे, या मागणीचे निवेदन शुक्रवारी ताराराणी रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले.