वाढीव ‘एस्टिमेट’चा फुगा फोडला

By admin | Published: August 13, 2016 12:03 AM2016-08-13T00:03:18+5:302016-08-13T00:39:14+5:30

महापालिकेची फसवणूक टळली : २७ लाख ५८ हजारांचे काम वाढविले होते ५५ लाखांपर्यंत

Extended bust of 'Estimate' | वाढीव ‘एस्टिमेट’चा फुगा फोडला

वाढीव ‘एस्टिमेट’चा फुगा फोडला

Next

कोल्हापूर : कोणत्याही विकासकामांच्या एस्टिमेटवर अलीकडे संशय बळावत चालला आहे. त्यातूनच चुकीच्या पद्धतीने वाढीव रकमेची एस्टिमेट करून महानगरपालिकेच्या निधीची उधळपट्टी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. नगरसेवक सत्यजित कदम व अजित ठाणेकर यांनी जयंती नाला उपसा केंद्रातील विविध कामांसाठी अधिकाऱ्यांनी फुगवून तयार केलेल्या ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांच्या एस्टिमेटचा पर्दाफाश केला आणि महानगरपालिकेची होणारी फसवणूक टाळली. ज्यांनी हे फुगविलेले एस्टिमेट केले, त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कदम व ठाणेकर यांनी केली आहे.
जयंती नाल्यातील सांडपाणी उपसण्याकरीता दसरा चौक येथील उपसा केंद्रांत विविध कामे करावी लागणार होती. त्यामध्ये ११ के.व्ही. उच्चदाबाचे कनेक्शन एक्स्प्रेस फिडरसह लोड वाढविण्याकरीता के बल व संलग्न मटेरियल पुरविणे, उभारणी व कार्यान्वित करणे अशा कामांचा या एस्टिमेटमध्ये समावेश होता. या कामासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांचे एस्टिमेट करून ते स्थायी समितीसमोर २९ एप्रिल २०१६ रोजी ठेवले होते. त्यास नगरसेवक अजित ठाणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. हेच काम करून देण्यासाठी महावितरण कंपनीने २७ लाख ५८ हजार रुपयांत करून देण्यास सहमती दर्शविली होती; परंतु ‘महावितरण’चा प्रस्ताव बाजूला ठेऊन मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या एस्टिमेटप्रमाणे काम करून घेण्याचा अट्टाहास धरला होता.
मनपाने तयार केलेले एस्टिमेट आणि ‘महावितरण’चा प्रस्ताव याचा अभ्यास केल्यानंतर अजित ठाणेकर यांनी चुकीचे एस्टिमेट असल्याचे प्रत्येक टप्प्यावर प्रशासनास पटवून दिले. केबल टाकणे, चर मारणे, त्याचा बेस तयार करणे, केबल हाप राऊंड गटरने कव्हर करणे आदी कामांबाबत प्रत्येक माप हे जवळजवळ दुप्पट धरण्यात आले होते. त्यामुळे एस्टिमेटमध्ये १३ लाखांचा फरक दिसत होता. अजित ठाणेकर व सत्यजित कदम यांनी सलग तीन सभेत हा विषय मांडला. त्यामुळे अखेर शुक्रवारी ही फुगविलेली निविदा रद्द करण्यात आली.
हेच काम महावितरण २७ लाख ५८ हजार रुपयांत करुन देण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला. नगरसेवकांच्या जागरूक व अभ्यासू वृत्तीमुळे महानगरपालिकेचे २७ लाख ६३ हजार रुपये वाचणार आहेत. ज्यांनी चुकीचे एस्टिमेट करून मनपाच्या निधीत भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला होता त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकर यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका सल्लागाराने चुकीचे एस्टिमेट तयार केल्याबद्दल त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी नोटीस बजावली असून त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. जयंती नाल्याजवळील कामात तर मनपाचे अधिकारीच सहभागी असल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे ठाणेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


जयंती नाल्यातील सांडपाणी उपसण्याकरीता दसरा चौक येथील उपसा केंद्रांत विविध कामे करावी लागणार होती.
या कामासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांचे एस्टिमेट करून ते स्थायी समितीसमोर २९ एप्रिल २०१६ रोजी ठेवले होते.
हेच काम करून देण्यासाठी महावितरण कंपनीने २७ लाख ५८ हजार रुपयांत करून देण्यास सहमती दर्शविली होती;
अजित ठाणेकर यांनी मनपाचे एस्टिमेट चुकीचे असल्याचे प्रत्येक टप्प्यावर प्रशासनास पटवून दिले.

नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांची दक्षता

Web Title: Extended bust of 'Estimate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.