महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:24+5:302021-04-02T04:25:24+5:30

कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापही मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून महाडीबीटी प्रणालीवर ...

Extension in accepting scholarship applications on MahaDBT system | महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

Next

कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापही मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास दि. १५ एप्रिलपर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी शुक्रवारी दिली.

संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांबाबत स्वीकृतीची कार्यवाही तात्काळ करावी. संस्थेतील पात्र असणारा एकही मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी. अशा विद्यार्थ्यांची परिपूर्ण स्वरूपातील अर्ज छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईनरित्या सादर करावयाचे आहेत. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीमधून महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणी करू नये. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाविद्यालयाकडून जर विहित कालावधित अर्जाबाबत कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले, तर अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय जबाबदार राहील. या कालावधीत महाविद्यालयांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन लोंढे यांनी केले आहे.

चौकट

‘लोकमत’ने मुद्दा मांडला

कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत वास्तव ‘लोकमत’ने दि. २४ मार्चच्या अंकात ‘शिष्यवृत्तीचे १७०२८ अर्ज प्रलंबित’ या वृत्ताद्वारे मांडले होते. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती.

Web Title: Extension in accepting scholarship applications on MahaDBT system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.