‘स्वस्तातील घरे’ योजनेला मुदतवाढ
By admin | Published: May 22, 2016 12:43 AM2016-05-22T00:43:02+5:302016-05-22T00:43:02+5:30
अर्ज आजही स्वीकारणार : इच्छुक लाभार्थ्यांची सुटीदिवशीही झुंबड, एकूण २५00 अर्ज दाखल
कोल्हापूर : ‘सर्वांसाठी घरे २०२२ पर्यंत’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘स्वस्तातील घरे’ अंतर्गत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज दाखल करण्यासाठी शिवाजी मार्केटच्या कार्यालयात शनिवारी बुद्ध जयंतीची शासकीय सुटी असतानाही इच्छुक लाभार्थ्यांची झुंबड उडाली होती.
शनिवारी सुटीदिवशी १४९ परिपूर्ण अर्ज दाखल करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण सुमारे २५०० अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येकाला घर देण्याचा शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आला असून, ही योजना कोल्हापूर शहरातही सुरू आहे.
या योजनेच्या मागणी सर्व्हेक्षणाकरिता गरीब-आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील शहरवासीयांना विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्याचा कालावधी २३ मेपर्यंत जाहीर केला होता; पण सर्वसाधारण सभेमध्ये याची मुदतवाढ देण्याबाबत सदस्यांत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अर्ज सादर करण्यासाठी ३१ मेअखेर मुदतवाढ देण्यात आली.
या अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो; पण या दोन्ही दाखल्यांच्या पूर्ततेसाठी लागणारा कालावधी विचारात घेता मुदतवाढ देणे योग्यच होते.
नागरिकांच्या सोयीसाठी शनिवारी बुद्ध जयंतीची शासकीय सुटी असतानाही शिवाजी मार्केटमधील कार्यकारी अभियंता कार्यालय सुरू ठेवण्यात आले
होते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांची झुंबड उडाली होती. सुटीच्या एका दिवशी सुमारे १४९ अर्ज जमा करण्यात आले. तर अनेकांची अपुरी कागदपत्रे असल्याने त्यांना माघारी फिरावे लागत होते. (प्रतिनिधी)
तहसील कार्यालयातून दिले ११ हजार दाखले
४अर्ज खरेदीच्या शुक्रवारी (दि. २०) अंतिम दिवसापर्यंत सुमारे २५ हजार अर्जांची विक्री करण्यात आली. तर अर्ज स्वीकारण्याचे काम आज, रविवारी सुटी दिवशीही सुुरूच राहणार असल्याची माहिती सामाजिक विकास विशेषतज्ज्ञ प्रसाद संकपाळ यांनी दिली.
४जे दाखले मिळत नाहीत म्हणून इच्छुक लाभार्थ्यांची ओरड सुरू असतानाच असे अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखले असे सुमारे ११ हजार दाखले करवीर तहसीलदार कार्यालयातून आतापर्यत देण्यात असल्याचे सांगण्यात आले.
४२५ हजार अर्जांची विक्री
४ सुटीदिवशी १४९ अर्ज दाखल
४एकूण २५०० अर्ज दाखल
४तहसीलने दिले ११ हजार दाखले
४३१ मेअखेर मुदतवाढ