बाह्यस्थ: नामिका सूचीत शिवाजी विद्यापीठ

By admin | Published: July 27, 2016 12:08 AM2016-07-27T00:08:58+5:302016-07-27T00:32:23+5:30

नामांकित संस्थांचा समावेश : शासनाच्या विविध शासकीय योजनांचे मूल्यमापन होणार

External: Shivaji University in the list of nominees | बाह्यस्थ: नामिका सूचीत शिवाजी विद्यापीठ

बाह्यस्थ: नामिका सूचीत शिवाजी विद्यापीठ

Next

कोल्हापूर : विविध शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यस्थ: संस्थांची नामिका सूचीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या दि. २२ जुलै २०१६च्या शासन निर्णयानुसार विविध शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यस्थ: संस्थांची नामिका सूची तयार केली आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. पाच वर्षांसाठी विद्यापीठाची नियुक्ती केली आहे.
प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत सीमित प्रमाणात योजनेचे मूल्यमापन सध्या करण्यात येते. मूल्यमापनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने तसेच नमुना पाहणी व सांख्यिकी विषयाबाबत शासनाच्या विभागांना व कार्यालयांना सल्ला देऊ शकेल अशा सक्षम व नामांकित संस्थांची नामिका सूची तयार केली आहे. या सूचीमध्ये शासन सहाय्यित संस्था-दहापेक्षा कमी जिल्ह्यात अथवा एका महसुली विभागासाठी शिवाजी विद्यापीठाची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)

समितीत तज्ज्ञांचा समावेश
समितीत यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे काम अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे यांनी केले. समितीत डॉ. एम. एस. देशमुख (अर्थशास्त्र), डी. एन. काशीद, संतोष सुतार (संख्याशास्त्र), पी. डी. राऊत (पर्यावरणशास्त्र), गिरीश कुलकर्णी (अभियांत्रिकी विभाग) यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश आहे.

Web Title: External: Shivaji University in the list of nominees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.