अतिरिक्त ‘सर’ बेघर!

By admin | Published: January 8, 2015 12:29 AM2015-01-08T00:29:28+5:302015-01-08T00:38:52+5:30

५९ शिक्षण संस्थांनी नाकारले : ११५ जण ‘ना घर का ना घाट का’

Extra 'Sir' homeless! | अतिरिक्त ‘सर’ बेघर!

अतिरिक्त ‘सर’ बेघर!

Next

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -सन २०१३ च्या पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकांना(सरांना) जिल्ह्यातील ५९ शिक्षण संस्थांनी माध्यमिक शिक्षण विभागाने हजर करून घेण्याच्या काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. वांरवार हेलपाटे मारूनही रुजू करून घेतलेले नाही. परिणामी अतिरिक्त अशा ११५ शिक्षकांची अवस्था ‘ना घर का ना घाटका’ अशी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार समायोजन करून न घेणाऱ्या संस्थांवर कारवाई होऊ शकते; परंतु कारवाईचे धाडस शिक्षण विभागाने अजूनतरी दाखविलेले नाही.
मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्यानुसार पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जात आहे. ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येनुसार जिल्ह्यात बीएड झालेले ७ हजार ६६९ तर डीएडचे १ हजार ५१० असे एकूण ९ हजार १७९ शिक्षकांची पदे मंजूर झाली. डीएडचे ९३९ तर ३६ बीएडचे शिक्षक अतिरिक्त ठरले. यातील ८६० शिक्षकांचे तालुका आणि संस्थास्तरावर रिक्त जागी समायोजन झाले. ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले.
शिक्षण प्रशासनाने संस्थानिहाय रिक्त जागांची यादी तयार केली आहे. त्यानुसार रिक्त जागेवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. अतिरिक्त शिक्षकांना रिक्त असलेल्या संस्थेत रूजू होण्याचा आदेश दिला जात आहे. संबंधित शिक्षक आदेश घेऊन संस्थेच्या शाळेत गेल्यानंंतर तांत्रिक कारणे सांगून परत कसा जाईल हे पहात आहेत.

रिक्त जागेवर अतिरिक्त शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार संस्था चालकांना सामावून घ्यावे लागणार आहे. अन्यथा कारवाई होणार आहे.
- ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

डोनेशन मुख्य अडचण...
नव्याने शिक्षक भरती शासनाने बंद केली आहे. बंदी उठविल्यानंतर सेवेत घेण्यासाठी ‘आपल्या’उमेदवारांकडून डोनेशन घेऊन बुकिंग केले आहे. अतिरिक्त शिक्षकांना सामायोजन करून घेतल्यास बुकिंग केलेल्या उमेदवाराचे पैसे संबंधित संस्थेला परत करावे लागणार आहे. परिणामी संस्थेला डोनशनवर पाणी सोडावे लागणार आहे. रूजू करून न घेण्याचे हेच मुख्य कारण आहे.

Web Title: Extra 'Sir' homeless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.