‘सीपीआर’ प्रसूती विभागावर ग्रामीणचा जादा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:59 AM2019-01-14T00:59:35+5:302019-01-14T00:59:40+5:30

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयावर (सीपीआर) ‘प्रसूती’चा अतिरिक्त ताण पडतो आहे. जिल्ह्यातील काही ...

Extra Strain of Rural on 'CPR' Department of Obstetrics | ‘सीपीआर’ प्रसूती विभागावर ग्रामीणचा जादा ताण

‘सीपीआर’ प्रसूती विभागावर ग्रामीणचा जादा ताण

Next

गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयावर (सीपीआर) ‘प्रसूती’चा अतिरिक्त ताण पडतो आहे. जिल्ह्यातील काही ग्रामीण रुग्णालये कर्मचाऱ्यांच्या किंवा औषधांच्या तुटवड्याचे कारण पुढे करून बाळंतीण व त्यांच्या नातेवाइकांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात सीपीआरमधील प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या नऊ महिन्यांत सिझेरियन व नॉर्मल मिळून ६३९२ प्रसूती झाल्या आहेत. त्यात ५० जुळी व एक तिळ्याचा समावेश आहे.
सीपीआरमधील प्रसूती विभागात रोज सरासरी २५ ते ३० प्रसूती होतात. नॉर्मल, सिझर व गायनॅक असे तीन वॉर्ड असून, साधारणत: २५ परिचारिका तीन वेळेत असतात; पण आता सीपीआरवर बाहेरून येणाºया प्रसूतीचा अतिरिक्त ताण वाढतोय आहे. अपुरे मनुष्यबळ, बाळंतिणीला लागणाºया औषधांचा तुटवडा आणि कॉटची संख्या कमी असल्याने डॉक्टरांसह कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते.
दरम्यान, सीपीआर अंतर्गत गांधीनगर, कोडोली, गडहिंग्लज व लाईन बझार येथील सेवा रुग्णालय ही चार उपजिल्हा, तर १६ ग्रामीण रुग्णालये, इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालये अशी एकूण २१ रुग्णालये येतात. ग्रामीण रुग्णालये अपुºया सुविधामुळे बाळंतिणीला सीपीआरमध्ये आणतात.
सीपीआरच्या प्रसूती विभागात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ मध्ये एकूण २९९५ सिझेरियन, नॉर्मल ६०६२ व जुळी मुले ६८, मोठ्या शस्त्रक्रिया ३३६६, लहान शस्त्रक्रिया ५४४, तर १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सिझेरियन २०४८, नॉर्मल ४३४४, तर जुळी ५०, मोठ्या शस्त्रक्रिया २६१०, लहान शस्त्रक्रिया २१४ झाल्या आहेत. या विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष शानभाग आहेत.
ग्रामीण रुग्णालयांवर हवा अंकुश
ग्रामीण रुग्णालये ही जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत येतात; पण तेथील अपुरे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. ग्रामीण रुग्णालयांवर प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी यांचा अंकुश नसल्याच्या भावना रुग्ण, नातेवाइकांतून व्यक्त होत आहेत.
जुळ्यांचे प्रमाण
वाढतंय... एक तिळी
गेल्या वर्षी मे २०१८ या महिन्यात तीन बाळंतिणीला दोन जुळी झाली आहेत, तर एका बाळंतिणीला तिळी (तीन अपत्ये) झाली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत एकूण ५० जुळी व एक तिळी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

Web Title: Extra Strain of Rural on 'CPR' Department of Obstetrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.