अतिरिक्त उपभोगासाठीच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : दिलीप कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:10 PM2019-12-28T15:10:22+5:302019-12-28T15:11:37+5:30
अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.
वारणानगर : अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.
पर्यावरण व निसर्गावर प्रेम करणाऱ्या या दाम्पत्याने वारणा भगिनी मंडळ व प्रज्ञान कला अकादमी यांच्यातर्फे आयोजित ‘पर्यावरण व बदलती जीवनशैली’ या विषयावर जाणकार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वारणा साखर कारखाना व वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे उपस्थित होत्या.
यावेळी मनावरील नियंत्रण तसेच जीवनशैलीतील बदलांद्वारे नैसर्गिक संपत्ती जपली जाऊ शकते, असे स्वानुभवातून आलेले मत या दाम्पत्याने मांडले. वारणानगर येथील नागरिकांशी त्यांनी तब्बल तासभर संवाद साधला.
यावेळी ‘प्रज्ञान’चे अध्यक्ष रमेश हराळे, उपाध्यक्षा नेहा आवटी, तानाजी शिंदे, शिक्षक घोडके तसेच सर्व संचालक उपस्थित होते. संवादादरम्यान झालेल्या चर्चेचे फलित म्हणून आपली जीवनशैली थोड्याफार प्रमाणात का असेना, पर्यावरणपूरक करावी, असे आवाहन शेवटी नीलेश आवटी यांनी केले.