कागलकरांचे डोळे पाणावले

By admin | Published: April 17, 2015 11:45 PM2015-04-17T23:45:03+5:302015-04-18T00:04:40+5:30

राजेंच्या अस्थिकलश दर्शनास गर्दी : कागल, मुरगूडमध्ये भावुक वातावरण

The eyeballs of Kagalakar | कागलकरांचे डोळे पाणावले

कागलकरांचे डोळे पाणावले

Next

कागल : ज्येष्ठ नेते आणि कागल शहराचे भूतपूर्व संस्थानिक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी शुक्रवारी कागलकरांनी भावपूर्ण वातावरणात गर्दी केली होती. राजेंचा अस्थिकलश पाहून अनेक महिला अश्रू रोखू शकल्या नाहीत. मुख्य मार्गावरून भजनी मंडळाच्या निनादात आणि ‘अमर रहे, अमर रहे, राजेसाहेब अमर रहे’, राजेसाहेब परत या...’ अशा घोषणा देत ही अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. येथील दूधगंगा नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कागलला आणावे, अशी कागलवासीयांची इच्छा होती. मात्र, मुळातच विक्रमसिंहराजेंना जिवंतपणी हे असले प्रकार आवडत नसल्याने त्यांच्या घरच्या लोकांनी या गोष्टीस नकार दिला. शुक्रवारी त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन तरी घ्यावे, या भावनेने येथील बसस्थानक चौकात अलोट गर्दी झाली होती. कोल्हापूरहून हा अस्थिकलश शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयात आणला. तेथून सजविलेल्या जीपमध्ये ठेवून बसस्थानक चौक, खर्डेकर चौक मार्गे गैबी चौकात काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, नगराध्यक्षा आशाकाकी माने, भैया माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, बॉबी माने, विवेक कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
मुरगूडमध्येही मोठी गर्दी
मुरगूडमध्ये अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सर्वस्तरातील हजारो कार्यकर्ते, महिलांनी गर्दी केली होती. मुरगूड शहरातून अस्थिकलश नेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास वेदगंगा नदीमध्ये अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. सकाळी नऊच्या सुमारास निपाणी-मुरगूड रस्त्यावरील नाका नं. १ जवळ अस्थिकलशाचे आगमन झाले. प्रारंभी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख, नगराध्यक्षा वसुधा कुंभार यांच्या हस्ते अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दत्तमंदिर येथील नदीघाटावर विलासराव गुरव, रामभाऊ खराडे, सुरेश सूर्यवंशी, पांडुरंग वंदुरे, नामदेव खतकर या पाच वारकऱ्यांच्या हस्ते या अस्थिकलशाचे वेदगंगा नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. ( प्रतिनिधी )


राममंदिराचे स्वप्न
राममंदिराजवळ मिरवणूक थांबली. बसस्थानकापासून अस्थिकलश मिरवणुकीने गैबी चौकाकडे जात असताना जीर्णोद्धाराचे काम सुरू असलेल्या श्रीराम मंदिराजवळ काही काळासाठी ही मिरवणूक थांबविण्यात आली. कागलमध्ये भव्य असे राममंदिर बांधण्याचे राजेंचे स्वप्न होते. ते या जीर्णाेद्धार समितीचे प्रमुख होते. या आठवणींनी अनेकांचे डोळे पाण्यांनी डबडबले.

Web Title: The eyeballs of Kagalakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.