विकासकामांमुळे शिरोळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:48+5:302021-07-17T04:20:48+5:30
जयसिंगपूर : मागील दोन वर्षांत सार्वजनिक आरोग्य व राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या योगदानातून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामांसाठी ...
जयसिंगपूर : मागील दोन वर्षांत सार्वजनिक आरोग्य व राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या योगदानातून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलतो आहे, असे उद्गार आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले.
टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील रेणुका मंदिर सांस्कृतिक सभागृह उभारणीच्या पायाभरणीप्रसंगी यड्रावकर बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती दीपाली परीट प्रमुख उपस्थित होत्या. याप्रसंगी आदित्य यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मंगला बिरनगे, उपसरपंच भरत पाटील, तुकाराम चिगरे, बाजीराव गोरे, अमोल गोरवाडे, वसंत गोरे, गणपती चिगरे, धनपाल कोथळी, सुनील चिगरे, राजू ऊगारे, बाळासो पाटील, अमोल चिगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १६०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे विकासकामांचा प्रारंभ आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.