निराधार वारांगनांचे चेहरे फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:33+5:302021-05-16T04:23:33+5:30

कोल्हापूर : वारांगना या कसेबसे आपले आयुष्य कंठत असतात, प्रत्येकाची त्यांच्याकडे विशिष्ट नजर असते; पण सद्या कोरोनाच्या परिस्थितीत त्यांच्या ...

The faces of the helpless prostitutes blossomed | निराधार वारांगनांचे चेहरे फुलले

निराधार वारांगनांचे चेहरे फुलले

Next

कोल्हापूर : वारांगना या कसेबसे आपले आयुष्य कंठत असतात, प्रत्येकाची त्यांच्याकडे विशिष्ट नजर असते; पण सद्या कोरोनाच्या परिस्थितीत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील काही चांगल्या भावनेने त्यांच्याकडे पाहणारेही आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल घोटणे, प्रसाद कालेकर, अमृत कालेकर, शेखर पोतदार, शिवराज महाडिक, पोलीस दिग्विजय चौगुले यांच्या पुढाकाराने शनिवारी शहरातील शंभरवर निराधार वारांगनांना प्रापंचिक साहित्यांच्या १०० वस्तूंचे कीट वाटप केले.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात वारांगनांना कडधान्य, तेल, तांदूळ, डाळ, आदी १०० वस्तू असणारे प्रापंचिक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. हे वाटप सुरू असताना वरुणराजानेही हजेरी लावली. शनिवार मध्यरात्रीपासूनच कडक लॉकडाऊन असल्याने किमान पुढील आठवड्याचा वारांगनांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला. हे कीट घेताना वारांगनांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले होते. त्यांनी मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी पोलीस निरीक्षक कटकधोंड यांनी, कोविड काळातील आरोग्य विषयाच्या काळजीचे महत्त्व व कायदेविषयक संरक्षणाची माहिती त्यांना दिली.

कीट वाटप करताना राहुल घोटणे यांनी, वारांगनांच्या प्रति आपुलकी संवेदना व्यक्त केली. यावेळी दिनेश गावित, सुनील जवहिरे, सुहास पोवार, तानाजी चौगुले, सहायक फौजदार राजू वरक यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो नं.१५०५२०२१-कोल-शाहूपुरी पोलीस स्टेशन

ओळ : कोल्हापूर कोरोना संकटात शहरातील निराधार वारांगनांना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या हस्ते प्रापंचिक साहित्यांचे कीट वाटप केले. यावेळी राहुल घोटणे, आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

150521\15kol_3_15052021_5.jpg

===Caption===

ओळ : कोल्हापूर कोरोना संकटात शहरातील निराधार वारांगणांना शाहूपूरी पोलीस ठाण्याचे पो.नि. श्रीकष्ण कटकधोंड यांच्या हस्ते प्रापंचिक साहित्यांचे किट वाटप केले. यावेळी राहूल घोटणे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The faces of the helpless prostitutes blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.