मुरगूड ग्रामीण रुग्णालय कोविड केंद्रास सुविधा देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:33+5:302021-05-22T04:22:33+5:30
मुरगूड : मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कोविड केंद्रास खासदार संजय मंडलिक यांनी भेट दिली. यावेळी या ...
मुरगूड : मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कोविड केंद्रास खासदार संजय मंडलिक यांनी भेट दिली. यावेळी या सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर्स, आरोग्यसेविका, वॉचमन, कक्ष सेवक, डाटा ऑपरेटर्स, धोबी, आदी कर्मचारी तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आपण युद्धपातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचारांविषयीची माहिती घेतली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी व डॉ. अमोल पाटील यांनी विविध समस्या मांडल्या. पूर्ण क्षमतेने कोविड सेंटर चालविण्यासाठी तातडीने अधिकचे कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही रुग्णांची हेळसांड होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना खासदार मंडलिक यांनी सर्वच विभागांना दिल्या. शहरात सर्व्हे करणाऱ्यांचे रुग्ण शोधण्याचे महत्त्वाचे काम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुरगूड शहरातील कोरोना स्थितीची माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पांडुरंग भाट, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, नगरसेवक सुहास खराडे, विशाल सूर्यवंशी, दीपक शिंदे, राजेंद्र भाट, दत्ता मंडलिक, अक्षय शिंदे, आदी उपस्थित होते.
फोटो : २१ मुरगूड संजय मंडलिक भेट
ओळ :- मुरगूड (ता. कागल) येथील नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटरला खासदार संजय मंडलिक यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. यावेळी सोबत नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ बी. एन. डवरी, डॉ. अमोल पाटील, आदी उपस्थित होते.