रिक्षाचालकासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कॉंग्रेस कमिटीत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:20+5:302021-05-26T04:25:20+5:30
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवानाधारकांना पंधराशे रुपयांचे सानुग्रह ...
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवानाधारकांना पंधराशे रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे रिक्षाचालकांसाठी नोंदणी सुविधा सुरू करण्यात आली.
यासाठी रिक्षाचालकांनी वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर. सी. बुक, लायसेन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षाचालकांना खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी, दीपक थोरात, ऋषिकेश पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, सचिन चावरे, आनंदा करपे, अक्षय शेळके, उदय पवार, विनायक पाटील, सुदर्शन तुळसे संजय वाईकर, आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २५०५२०२१-कोल-कॉग्रेस कमिटी
ओळ - कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे रिक्षाचालकांना अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा मंगळवारी उपलब्ध करून दिली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, गुलाबराव घोरपडे उपस्थित होते.