‘राष्ट्रवादी विद्यार्थी’मधील गटबाजी उफाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:26+5:302021-05-17T04:23:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. माजी जिल्हाध्यक्षांकडून नूतन अध्यक्षांवर सोशल मीडियातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. माजी जिल्हाध्यक्षांकडून नूतन अध्यक्षांवर सोशल मीडियातून आरोप सुरू आहेत. पक्ष शिस्त मोडून बदनामी केल्याने पक्ष नेतृत्वाने संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील गव्हाणे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सेल मजबुतीसाठी आढावा दौरा केला. यामध्ये जिथे सेल कमकुवत आहे, ते बरखास्त केले. कोल्हापूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम समाधानकारक नव्हते. तीन-चार वर्षांपासून संघटनात्मक पातळीवर काहीच काम नसल्याने जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली. जिल्हाध्यक्ष पदाच्या मुलाखती घेऊन व जिल्ह्यातील नेत्यांच्या शिफारसीनुसार नवीन चेहऱ्याला संधी दिली. त्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष नाराज झाले आणि सोशल मीडियातून बदनामीकारक मजकूर टाकत आहेत. मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्षासह जिल्ह्यातील नेत्यांची बदनामी सुरू केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. माजी जिल्हाध्यक्षाच्या कृत्याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.