कोरोना नियमांबाबत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:51+5:302021-04-19T04:22:51+5:30

थर्मल स्कॅॅनरने तपासणी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, आदी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन आणि राज्य शासनाने केलेल्या सूचनांनुसार कारखाने, ...

Factories in industrial estates under investigation over corona regulations | कोरोना नियमांबाबत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची तपासणी सुरू

कोरोना नियमांबाबत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची तपासणी सुरू

Next

थर्मल स्कॅॅनरने तपासणी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, आदी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन आणि राज्य शासनाने केलेल्या सूचनांनुसार कारखाने, उद्योग सुरू ठेवण्यास या संचारबंदीमध्ये परवानगी आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगांव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकीत औद्योगिक वसाहतींमध्ये काही उद्योग सध्या सुरू आहेत. त्यामध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होत आहे का? याची तपासणी करण्यासाठी उद्योग विभागाने नेमलेली तीन भरारी पथके रविवारी कार्यान्वित झाली. या पथकांनी काही कारखान्यांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. त्यामध्ये कोरोना नियमांचे पालन होत असल्याचे त्यांना दिसून आले. उद्योग विभागाने औद्योगिक संघटनांची बैठक घेऊन कोरोना नियमांचे पालन करण्यासह कामगारांची कोरोनाबाबतची तपासणी (रॅपिड ॲॅन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट) आणि लसीकरण करून घेण्यासाठी उद्योजकांना सूचना कराव्यात, असे आवाहन केले होते. त्यानुसार शिरोली आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील तीन मोठ्या उद्योगांनी त्यांच्या कामगारांची कोरोनाची चाचणी करून घेतली.

चौकट

...अन्यथा कारवाई होणार

राज्य शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उद्योग विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. कारखाने, उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होत आहे का? याची तपासणी सुरू केली आहे. ज्या कारखाने, उद्योगांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्योग विभाग आणि औद्योगिक संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार काही मोठ्या उद्योगांना कामगारांची कोरोनाबाबतची तपासणी सुरू केली असल्याचे उद्योग विभागाचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांनी रविवारी सांगितले.

फोटो (१८०४२०२१-कोल-एमआयडीसी फोटो) : उद्योग विभागाने केलेल्या सूचनेनुसार कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी उद्योजकांकडून कामगारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

===Photopath===

180421\18kol_14_18042021_5.jpg

===Caption===

फोटो (१८०४२०२१-कोल-एमआयडीसी फोटो) : उद्योग विभागाने केलेल्या सूचनेनुसार कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांकडून कामगारांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.

Web Title: Factories in industrial estates under investigation over corona regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.