आरक्षण लढ्यात योगदान देणाऱ्या घटकांचा रविवारी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:27 AM2019-07-06T11:27:48+5:302019-07-06T11:30:47+5:30
सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित
कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाहू छत्रपती हे भूषविणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील व जयेश कदम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या कृतज्ञता समारंभात मराठा आरक्षण लढ्यात सर्व समाजातील ज्या बांधवांनी सहकार्य केले, त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे; तर मराठा मंत्रिगट समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, महापौर माधवी गवंडी, मराठा महासंघाचे शशिकांत पोवार, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे, वरिष्ठ विधिज्ञ सतीश माने, अॅड. अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सत्यजित पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादकही उपस्थित राहाणार आहेत.
या समारंभाची सुरुवात शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्याने होणार आहे. कार्यक्रमासाठी येणाºया मराठा बांधवांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात करण्यात आली आहे. तरी या समारंभास सर्व जातिधर्मांतील बांधव, भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक अजित ऊर्फ पिंटू राऊत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, इंद्रजित सावंत, रूपेश पाटील, उत्तम कोराणे, धनंजय सावंत, बाजीराव चव्हाण, विजय मांगुरे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.