फडणवीस ‘बोगस’ तर सदाभाऊ ‘भामटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:12 AM2019-02-11T00:12:39+5:302019-02-11T00:12:44+5:30
कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक ...
कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये रॅपीड प्रश्नावलीत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टÑवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल एका वाक्यात तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर ‘ फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे सडेतोड व रोखठोक उत्तर दिली. कॉँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे, घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘खात्म्या’साठी देव पाण्यात!
शेतकºयांची वकिली सरकारच्या पातळीवर केल्याने अनेकजणांची अडचण झाली; त्यामुळेच माझा खात्मा करण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत; पण जोपर्यंत शेतकरी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत आपण बिनधास्त असल्याचेही ते म्हणाले.
परवानगी द्या वजनकाटे उभे करू
खासदार निधीतून गावागावांत वजनकाटे उभारण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेतली; पण स्थानिकची मिळ त नाही. मतदारसंघातच नव्हे राज्यात कोणीही काट्याची मागणी केली, तर तिथे काट्यासाठी निधी देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.
आवाडेंना पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही
घराणेशाहीविरोधात आपण आहोत, सदाभाऊंना ‘स्वाभिमानी’ खासगी कंपनी करायची होती, हे चालणार नाही, याच भूमिकेतून सागर खोतला विरोध केला. गेल्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात लढलो, मग जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडेंना पाठिंबा दिला कसा? हा आरोप चुकीचा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टींना विचारलेले
प्रश्न, कंसात उत्तरे
शेतकरी की लेखक (लेखक)
दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच)
कोणाची भीती वाटते
(भीतीच नाही)
राग आला तर (डोळे मिटतो)
मनाला लागलेला आरोप
(जमिनी घेतल्याचा)
काय करायला नको होते (महायुती)
शेतकºयांच्या घामापुढे राजकारण खड्ड्यात!
ते म्हणाले, शेतकºयांसाठीच आम्ही राजकारणात सक्रीय आहोत, ‘हातकणंगले’ मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत, ‘एफआरपी’साठी त्या सगळ्यांना अंगावर घेतले आहे. राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी.