विश्वास कारखाना इथेनॉल, सहवीज प्रकल्पाची क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:27+5:302021-03-15T04:23:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सरुड : विश्वासराव नाईक साखर कारखाना ऊसाच्या रसापासून इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करणार ...

Faith Factory will increase the capacity of the ethanol, covalent project | विश्वास कारखाना इथेनॉल, सहवीज प्रकल्पाची क्षमता वाढविणार

विश्वास कारखाना इथेनॉल, सहवीज प्रकल्पाची क्षमता वाढविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सरुड : विश्वासराव नाईक साखर कारखाना ऊसाच्या रसापासून इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

चिखली येथे कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर हे प्रमुख उपस्थित होते. आमदार नाईक पुढे म्हणाले, चालू हंगामात कारखान्याने ५ लाख ८० हजार ८४३.५२० मेट्रिक टनाचे गाळप करून ६ लाख ६२ हजार १६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. १२.६५ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

यावेळी युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली.

यावेळी कारखान्याचे संचालक व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील आदींसह सर्व संचालक, कामगार संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते .

फोटो ओळी .

चिखली येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात साखर पोत्यांच्या पूजनाप्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार बाबासाहेब पाटील, हंबीरराव पाटील , विराज नाईक आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.

Web Title: Faith Factory will increase the capacity of the ethanol, covalent project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.