सभासदांचा विश्वास हेच शाहू कारखान्याच्या यशाचे गमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:54+5:302021-09-02T04:49:54+5:30
कणेरी : सभासद शेतकऱ्यांचा शाहू साखर कारखान्यावर असलेल्या विश्वास हेच शाहू कारखान्याचे यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन शाहू ...
कणेरी : सभासद शेतकऱ्यांचा शाहू साखर कारखान्यावर असलेल्या विश्वास हेच शाहू कारखान्याचे यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांनी केले. कणेरी मठ येथे कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. काडसिद्धेश्वर पॉवरलूम संस्थेच्या इमारतीत शाहू साखर कारखान्याच्या कणेरी, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, कंदलगाव व गिरगाव या पाच गावांसाठीच विभागीय शेती कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या वेळी बापूसो कोंडेकर, वसंत पाटील, शिवाजीराव पाटील, अनिल नाईक, सुरेश पाटील, टी. के. पाटील, दगडू रणदिवे, रवींद्र मोरे, एम. डी. पाटील, बापुसो संकपाळ, सरपंच उज्वला शिंदे, उपसरपंच उज्वला पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
फोटो : ०१ कणेरी शाहू साखर कारखाना
कणेरी मठ येथे शाहू साखर कारखान्याचा शेती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारभावेळी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले.