""श्रद्धा"" पॅटर्न पुन्हा अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:12+5:302020-12-05T04:50:12+5:30
यड्राव : श्रद्धा इन्स्टिट्युट ऑफ करिअर डेव्हलपमेंट (एसआयसीडी) इचलकरंजीच्या १२४ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाइलपेक्षा जादा गुण प्राप्त करून एमएचटी-सीईटी ...
यड्राव : श्रद्धा इन्स्टिट्युट ऑफ करिअर डेव्हलपमेंट (एसआयसीडी) इचलकरंजीच्या १२४ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाइलपेक्षा जादा गुण प्राप्त करून एमएचटी-सीईटी (पीसीएम) परीक्षेमध्ये यश प्राप्त केले आहे. संयम मेहता याने राज्यातील शंभर पर्सेंटाइलच्या यादीत स्थान पटकाविले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेच्यावतीने करण्यात आला. या यशाने पुन्हा एकदा ''''श्रद्धा'''' पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.
नुकत्याच लागलेल्या एमएचटी-सीईटी (पीसीएम) निकालांमध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या संयम मेहता याने शंभर पर्सेंटाइल गुण प्राप्त करून राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे, तर २७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाइल, २१ विद्यार्थी ९८ पर्सेंटाइल, ३३ विद्यार्थी ९५ पर्सेंटाईल, तर ४२ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाईल गुण प्राप्त केले आहेत. शाम रांदड याने केमिस्ट्रीमध्ये व मिथिला धूत हिने मॅथस विषयामध्ये १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए. आर. तांबे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अभिषेक तांबे, प्रा. एम. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेशासाठी श्रद्धा इन्स्टिट्यूट ही अग्रगण्य शिक्षण संस्था बनली आहे. या निकालाने पुन्हा एकदा ''''श्रद्धा'''' पॅटर्न अव्वल ठरला आहे.
प्रा. सुप्रिया कौंदाडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी राहुल खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रा. संगीता पवार यांनी आभार मानले.
फोटो - ०२१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - श्रद्धा इन्स्टिट्यूट इचलकरंजी येथे एम. एच. टी. सी. इ. टी.मध्ये गुणवंतांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ए. आर. तांबे, अभिषेक तांबे, प्रा. एम. एस. पाटील, प्रा. सुप्रिया कौंदाडे, प्रा. संगीता पवार, प्रा. राहुल खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.