सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; ९७९ तक्रारी, तत्काळ कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:35+5:302021-07-07T04:28:35+5:30
कोल्हापूर : सध्या बऱ्याच लोकांचे फेसबुक अकाऊंट प्रोफाईल बनावट (फेक) बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे ...
कोल्हापूर : सध्या बऱ्याच लोकांचे फेसबुक अकाऊंट प्रोफाईल बनावट (फेक) बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढले आहे. तक्रारदात्याने सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या तक्रारीची दखल तत्काळ घेतली जाते. तक्रारदात्यासमोर असे फेक अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया केली जाते. गेल्या तीन वर्षांत अशा ९७९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांचे निराकरण करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन आणि वाढती गुन्हेगारी यामुळे फसवणूक करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक हॅकर्स असे कृत्य करतात आणि पैसे मिळवतात. सोशल मीडियावर फेक अकाऊंटसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांत ते बंद केले जाईल. असे केंद्र सरकारच्या आयटी विभागाचे नियम सांगतात. त्यानुसार कोल्हापुरातही पोलिसांच्या सायबर सेलकडे अशा तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याचे निराकरण करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ अशी फेक अकाऊंट बंद करण्यात आहेत. गेल्या तीन वर्षांत बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फसवणूकप्रकरणी ९७९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांचे निराकरण पोलिसांनी तत्काळ केले आहे. काही सोशल मीडियावरील बदनामीच्या पोस्टवर कारवाई करण्यात अडचणी येतात. कारण, फेसबुकचा सर्व्हर भारतात नाही. त्यामुळे फेसबुक कंपनीकडे या तक्रारींची नोंदणी केली जाते. त्यानंतर २१ दिवसांत या तक्रारींचेही निराकरण केले जाते.
फेसबुक हॅक, फेक प्रोफाईल तयार झाल्यानंतर करावयाची कार्यवाही अशी,
वैयक्तिक स्वत:ची फेक प्रोफाईल अशी होते बंद
- सर्च फेक फेसबुक प्रोफाईल-प्रोफाईलच्या More म्हणजे तीन डाॅट असणाऱ्या option मधून Find support or Report Profile क्लिक करावे.
- Pretendign to be someone या पहिल्या option वर क्लिक करा. पुढे तीन option दिसतील Me, A Friend आणि celebrity त्यापैकी आपली स्वत: ची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने Me वर क्लिक करावे.
इतरांनीही तक्रार केल्यानंतर होते फेक प्रोफाईल बंद
- आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्ट वरील अकाऊंटवर जाऊन वरीलप्रमाणे इन्स्ट्रक्शन फाॅलो करून तिथे फक्त Me ऐवजी A Friend सिलेक्ट करावे.
- Next केल्यानंतर एक बाॅक्स येईल. त्या बाॅक्समध्ये तुमच्या ज्या मित्राची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे. त्याचं नाव तिथे टाईप करा. तिथे तुमच्या मित्राची फेसबुक प्रोफाईल येईल, तिला सिलेक्ट करा. रिपोर्ट सेंड करावे, फेक फेसबुक प्रोफाईल काही वेळाने बंद होतील.
तक्रारीनंतर तत्काळ होते खाते बंद
- प्रथमत: ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे. त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधावी. स्वत: शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे. त्यांच्याकडून फेक प्रोफाईलची फेसबुक लिंक मागवून घ्या.
- त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजूला तीन डाॅट दिसतील, त्या डाॅटवर क्लिक करावे.
- तुमच्या समोर Find Support or Report profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- pretendign To be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील. Me, A Friend आणि Celebrity.
- आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट करा. फेक प्रोफाईल अकाऊंट काही वेळाने बंद होईल.
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर हे करा
- इतरांनीही प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना, आपल्याला आलेली फेक फ्रेंड रिक्वेस्टवरील अकाऊंटवर जाऊन वरीलप्रमाणे तंतोतंत इन्स्ट्रक्शन फाॅलो करून तिथे फक्त Me ऐवजी Friend सिलेक्ट करावे. नेक्स्ट केल्यानंतर नाव टाईप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बाॅक्स येईल. त्या बाॅक्समध्ये तुमच्या ज्या मित्राची ओरीजनल फेसबुक प्रोफाईल येईल, तिला सिलेक्ट करा. रिपोर्ट सेंड केलेनंतर फेक प्रोफाईल काही वेळाने बंद होईल.
तक्रार अशी करा
जिल्हा पोलीस दलात कार्यान्वित असलेल्या सायबर सेल अथवा जवळच्या पोलीस ठाण्यातही अशा प्रकारची तक्रार करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे सायबर सेलकडे अशी तक्रार घेऊन गेल्यास त्याचे तत्काळ निराकरण केले जाते.
आतापर्यंत सायबर व पोलिसांकडे आलेल्या आलेल्या तक्रारी
२०२०- २७९
२०२१ जूनपर्यंत - ६०० तक्रारी
कोट
अशा तक्रारींची नोंद तत्काळ घेतली जाते. तक्रारकर्त्यासमोर तत्काळ दहा ते पंधरा मिनिटांत असे फेक प्रोफाईल बंद केले जाते. याकरिता URL link चा वापर केला जातो.
-श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक, सायबर सेल ,कोल्हापूर जिल्हा पोलीस दल