पोलीसपाटलांवर खोटा आरोप, कुंभोजमधील ग्रामस्थांचे प्रांतांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:26+5:302020-12-11T04:51:26+5:30
इचलकरंजी : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील पोलीसपाटील महंमद पठाण यांच्याविरोधात हेतुपुरस्सर खोटा आरोप करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई ...
इचलकरंजी : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील पोलीसपाटील महंमद पठाण यांच्याविरोधात हेतुपुरस्सर खोटा आरोप करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन कुंभोज येथील काही ग्रामस्थांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
निवेदनात, कुंभोजचे पोलीसपाटील हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून पैशाची मागणी करतात. तसेच नागरिकांना दाखले देण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा खोटा आरोप करीत दगडू माने हे प्रांत कार्यालयासमोर सोमवार (दि. ७) पासून उपोषणास बसले आहेत. मात्र, प्रशासनाविरोधात तक्रार अर्ज करून माने हे त्रास देतात. तसेच ते जाणीवपूर्वक आरोप करीत असल्याचे म्हटले आहे. शिष्टमंडळात सदाशिव कुलकर्णी, फैय्याज मुजावर, गजानन माने, सुहास माळी, कुमार माने, किरण कांबळे, अमृत खोत, आदींचा समावेश होता.