कडकडीत बंदने हद्दवाढीस विरोध

By Admin | Published: June 18, 2016 12:34 AM2016-06-18T00:34:02+5:302016-06-18T00:42:46+5:30

१८ गावांत आंदोलन : बैठका, रॅली, डिजिटल फलकाद्वारे केला निषेध; शासकीय समितीचे लक्ष्य वेधले

False conflicts | कडकडीत बंदने हद्दवाढीस विरोध

कडकडीत बंदने हद्दवाढीस विरोध

googlenewsNext

शिरोली : हद्दवाढ विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर परिसरातील १८ गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. बालिंगे, पीरवाडी येथे हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. याशिवाय शिंगणापूर, वडणगे, उजळाईवाडी, उचगांव, पाचगाव, गोकुळ शिरगाव आदि गावांत ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला. शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हद्दवाढ विरोधात बैठक झाली. कळंबा व नागाव येथे डिजिटल फलक उभारुन ग्रामस्थांचे लक्ष्य वेधण्यात आले.


शिराली, नागावात रॅली
शिरोली : शिरोलीत व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हद्दवाढ विरोधात बैठक झाली. यामध्ये हद्दवाढ विरोधी कृती समितीचे सदस्य महेश चव्हाण, सरपंच बिस्मिल्ला महात, उपसरपंच राजू चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, बाजीराव पाटील, सलीम महात, सुरेश यादव, गोविंद घाटगे, शिवाजी कोरवी, शिवाजी खवरे, डॉ. सुभाष पाटील, विजय जाधव, दीपक यादव, शरद गायकवाड, लियाकत गोलंदाज, रणजित केळुसकर, मुकुंद नाळे, सागर कौंदाडे उपस्थित होते.
नागावात सर्व शाळा, सहकारी संस्था, किराणा दुकाने, ट्रान्सपोर्ट कार्यालये, तसेच गावाच्या पश्चिमेस असणारे काही कारखानेही बंद राहिले. गावात ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले होते. शुक्रवारी सकाळी सरपंच भीमराव खाडे, उपसरपंच विवेक लंबे, किरण मिठारी, बळवंत घाटगे (गुरुजी), दीपक लंबे, राहुल पाटील, विजय पाटील, प्रकाश पोवार, जयसिंग यादव, माणिक सावंत, भिकाजी सावंत यांनी सकाळी मोटारसायकलवरून फेरी काढली.
उचगाव, उजळाईवाडीत बंद
उचगाव : उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडीत कडकडीत बंंद पाळण्यात आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हद्दवाढीबाबत नेमका निर्णय काय होतो, याकडे उपनगर परिसरातील गावांचे लक्ष लागून राहिले आहे.
उचगावमध्ये सरपंच सुरेखा चौगुले, माजी सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच सचिन देशमुख, अविनाश मोळे, सचिन चौगुले, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सचिन सातकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर पोवार, आदी सहभागी झाले होते. उजळाईवाडीत काढलेल्या रॅलीत सरपंच स्मिता आंबवडे, उपसरपंच वैशाली सुतार, सदस्य एकनाथ माने, बाळू पुजारी, अनिल लांडगे, तानाजी चव्हाण, माजी सरपंच काकासो पाटील, उत्तम आंबवडे, सचिन पाटील, नंदू मजगे, अमोल देसाई, नितिन जाधव, सुनील गुमाणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बालिंगा, नागदेववाडी,
शिंगणापूर बंद
लक्षतीर्थ वसाहत : हद्दवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळपासून फुलेवाडी नाक्यासह नवे बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, आदी परिसरात बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढली.
हद्दवाढ विरोधात कडकडीत बंद
कळंबा : कळंबा ग्रामपंचायतच्यावतीने व ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.हद्दवाढीविरोधात घोषणा देतच सरपंच अजय सावेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तालीम मंडळे, महिला बचत गट, सदस्य मोठ्या संख्येने सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीसमोर जमले. हद्दवाढीविरोधात घोषणा देत संपूर्ण कळंबा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच दीपक तिवले, महादेव खानविलकर, प्रकाश कदम, विश्वास गुरव, भगवान पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वडणगेत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे ग्रामस्थांनी आपला तीव्र विरोध दर्शविला. दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनी गावास भेट देऊन ‘बंद’ला पाठिंबा दिला.
येथील स्थानिक हद्दवाढ कृती समितीने ‘गाव बंद’ची हाक दिलेली होती. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून ‘बंद’ यशस्वी केला. सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र येऊन हद्दवाढी विरोधात घोषणा दिल्या. यावेळी सरपंच जयश्री नाईक, उपसरपंच रघुनाथ अस्वले, सदस्य सचिन चौगले, बाजीराव पाटील, तंटामुक्तचेअध्यक्ष सुभाष पाटील, आनंदा नावले, एस. डी. जौंदाळ, सुनील पोवार, रमेश कुंभार, मुन्वर मुल्ला, इंद्रजित पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गांधीनगर, गडमुडशिंगी, वळिवडे बंद
गांधीनगर : गांधीनगरसह गडमुडशिंगी, वळिवडे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तावडे हॉटेलपासून गांधीनगर बाजारपेठेत एकही दुकान उघडे नव्हते. व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.
ग्रामपंचायतीसह सर्व संस्था बंद राहिल्या. चिंचवाड रोडवरील सर्व वाहतूक संस्थांनी बंदला पाठिंबा दिला व संस्थाचालक बंदमध्ये सक्रिय सहभागी झाले. हद्दवाढीच्या निषेधार्थ सिंधी सेंट्रल पंचायतीमध्ये भजनलाल डेंबडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. होलसेल व्यापारी असोसिएशन अध्यक्ष ताराचंद वाधवानी, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, सरपंच लक्ष्मीबाई उदासी, उपसरपंच गुड्डु सचदेव, सागर उदासी, सुनील जेसवानी, पप्पू पाटील, पे्रम लालवाणी, विजू जेसवाणी, प्रताप चंदवाणी, सेवाराम तलरेजा, रोहन बुचडे, किशन वधवा, मनोज बचवानी, भाजपचे शहराध्यक्ष श्रीचंद पंजवानी यांनी हद्दवाढीला कडाडून विरोध दर्शविला. गडमुडशिंगी : गडमुडशिंगी येथे सरपंच सुरेखा गवळी, उपसरपंच तानाजी पाटील, संजय दांगट, अशोक दांगट, जितेंद्र यशवंत, आप्पासाहेब धनवडे, आदी पदाधिकाऱ्यांनी बंदचे आवाहन केले. त्यास संपूर्ण गावातील संस्था, व्यापारी व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्रस्तावित हद्दवाढीबाबत निषेध नोंदविला.
वळिवडेत बंद
वळिवडे : सरपंच सौ. रेखाताई पळसे, उपसरपंच सचिन चौगले, सुहास तामगावे, रावसाहेब दिगंबरे, अनिल पंढरे, सुरेश पोवार, सुरेश माने, माजी सरपंच भगवान पळसे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार सर्व सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, दुकाने, सोसायट्या बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.अनिल पंढरे, सुहास तामगावे, भगवान पळसे, प्रकाश शिंदे, रावसाहेब दिगंबरे, सुरेश पोवार, कृष्णात शेळके, आदींनीही प्रस्तापित हद्दवाढीचा निषेध नोंदविला.


पिरवाडीत निषेध
सडोली (खालसा) : पिरवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी शासनाचा व महानगरपालिकेचा निषेध करून गावात कडकडीत बंद पाळला. यावेळी गावातून शासनविरोधी घोषणा देत गावातून रॅली काढली व ग्रामपंचायतीसमोर झालेल्या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी करवीर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे, संजय पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच मधुकर लोहार, साताप्पा लाड, कृष्णात धोत्रे, अजित खोत, सतीश शेळके, बाजीराव जाधव, पांडुरंग मिठारी, जयसिंग पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: False conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.