धबाबा तोय आदळे !

By admin | Published: June 30, 2017 11:02 PM2017-06-30T23:02:17+5:302017-06-30T23:02:17+5:30

धबाबा तोय आदळे !

False knock! | धबाबा तोय आदळे !

धबाबा तोय आदळे !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रोद्योगामधील मूल्यवर्धनाची साखळी अखंड राहण्यासाठी जॉब वर्क (खर्चीवाला) यंत्रमागधारकाने जीएसटी नंबर काढणे आवश्यक आहे. कारण खर्चीवाले यंत्रमागधारक हे मजुरी घेऊन कापड उत्पादन करीत असले तरी सूत विणून कापडाचे उत्पादन होत असते. त्यामुळे मूल्यवर्धनावरील कराचा परतावा परत मिळण्यासाठी कापड व्यापाऱ्यास खर्चीवाले यंत्रमागधारकाच्या जीएसटी नंबरचा उपयोग होतो, अशी माहिती कर सल्लागार विश्राम कुलकर्णी यांनी दिली.
येथील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या जीएसटी कराच्या कार्यशाळेत कुलकर्णी बोलत होते. दिवसभर सुरू असलेल्या कार्यशाळेचा लाभ यंत्रमागधारक, स्वयंचलित मागधारक, कापड व्यापारी व वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य व्यावसायिकांनी घेतला. उत्तम-प्रकाश चित्रमंदिरात झालेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी प्रास्ताविकात वस्त्रोद्योगामध्ये असलेले घटक आणि त्यामधील विणकाम करणाऱ्या यंत्रमागधारकाची भूमिका याचा आढावा घेतला.
कुलकर्णी म्हणाले, वार्षिक उलाढाल २0 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या व्यापार, व्यावसायिक, उद्योजक या घटकांना जीएसटी लागू नाही. मात्र, वस्त्रोद्योगामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाच्या टप्प्यावर मूल्यवर्धन होत असल्याने कराचा परतावा आवश्यक असेल, तर जीएसटी नंबर काढणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, वस्त्रोद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या कापडाच्या विक्रीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतील.
कार्यशाळेसाठी जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, विश्वनाथ मेटे, महावीर जैन, प्रमोद महाजन, महंमद रफिक खानापुरे यांच्यासह यंत्रमागधारक, व्यावसायिक, व्यापारी उपस्थित होते.


इचलकरंजी येथे वस्त्रोद्योगातील विविध घटकांना लागू होणाऱ्या जीएसटी विषयक कार्यशाळेमध्ये कर सल्लागार शेखर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील, सतीश कोष्टी, महंमदरफिक खानापुरे उपस्थित होते.

Web Title: False knock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.