कोल्हापुरात अन्न औषध प्रशासनाची 'कीर्ती' २५ हजारांची लाच घेताना महिला अधिकारी जाळ्यात, घरात सापडले ८० तोळे सोने
By पोपट केशव पवार | Published: April 26, 2024 07:31 PM2024-04-26T19:31:24+5:302024-04-26T19:31:31+5:30
कोल्हापूर : किणी, (ता. हातकणंगले) येथील मे.सम्राट फुडस रेस्टाॅरंटवरील कारवाई थांबविण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती ...
कोल्हापूर : किणी, (ता. हातकणंगले) येथील मे.सम्राट फुडस रेस्टाॅरंटवरील कारवाई थांबविण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख ( रा. विश्व रेसीडेन्सी, फ्लॅट नं.२०२, ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ पत्ता_ रा. समर्थनगर, मोहोळ, ता.जि. सोलापूर) ही शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली.
देशमुख हिला शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. देशमुख याच्या घेतलेल्या घराच्या झडतीत ८० तोळे सोने, साडेतीन लाखांची रोख रक्कम आणि डायमंडचा हार सापडला आहे. देशमुख हिच्याकडे हातकणंगले तालुक्याची जबाबदारी होती.