सैनिक टाकळीतील शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 04:22 PM2020-10-28T16:22:29+5:302020-10-28T16:26:04+5:30
ex serviceman ,home, flood, kolhapurnews शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना टुमदार घरे बांधून दिली जाणार आहेत. हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना टुमदार घरे बांधून दिली जाणार आहेत. हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
सैनिक टाकळी येथील जवान सचिन बिरांगे हे २००१ च्या कारगील युद्धात शहीद झाले. अशातच गतवर्षीच्या पुरात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी या संस्थेच्यामार्फत घरे बांधून देण्याचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी आर. रामकृष्णन, डी. टी. थामस, चरणदीप सिंग, आशिष कचौलिया, डी.सी. पटेल यांनी अर्थसहाय्य केले आहे.
याअंतर्गत आता बिरांगे कुटुंबीयांबरोबरच गीतांजली चरापले, आक्काताई माने, विजूताई चावरे यांनाही या गृहप्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ आभासी स्वरूपात झाला.
आदित्य बिर्ला समूह आणि संस्थेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला यांनी या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांची संख्या ११ लाख झाल्याचे सांगितले. वीरपत्नी अर्चन बिरांगे यांनीही यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युअर यांनीही सहभाग नोंदविला.