CoronaVirus Lockdown : एस.टी चालक -वाहकांसाठी कौटुंबिक संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 03:21 PM2020-04-06T15:21:59+5:302020-04-06T15:32:58+5:30
दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नातेवाईकांची भेटीगाठी, कधी समारंभ यातच सुट्टीचा दिवस संपायचा मात्र लॉकडाऊनमुळे चालक - वाहकांना कधी नव्हे ते कुटुंबाच्या सोबतीने दिवस घालवत येत आहे.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नातेवाईकांची भेटीगाठी, कधी समारंभ यातच सुट्टीचा दिवस संपायचा मात्र लॉकडाऊनमुळे चालक - वाहकांना कधी नव्हे ते कुटुंबाच्या सोबतीने दिवस घालवत येत आहे.
सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटीच.एसटी महामंडळाचा कणा असलेल्या चालक व वाहकांना देशातील लॉकडाऊनमुळे सुट्टी मिळाली आहे. सामान्य प्रवाशांना सणवारामध्ये सुखरुपपणे गावी सोडण्यातच चालक - वाहकांचा सणवार रस्त्यावर व्हायचा, डबल डयुटीमध्ये कधीच मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही. कुटुंबाला, स्वत:ला वेळ देता येत नव्हता, मात्र या लॉकडाऊनमुळे नोकरी लागल्यापासून प्रथमच कुटूंबासोबत वेळ घालवता आल्याचे अनेक जण सांगत आहेत.
दररोज सकाळी सवडीने उठणे, निवांत चहा नाष्ट करणे काहीच काम नसल्यामुळे सगळेच टिव्हीवरील बातम्या, जुन्या मालिका आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद तसेच मुलांचा अभ्यास घेण्यामध्ये स्वत: ला गुंतवणून घेत आहे. बातम्या पाहून कंटाळा आल्यावर विरंगुळा म्हणून काही सर्व जण सोशल मिडियावर रमतात.
काहींनी कॉलेज, शाळेतील, नातेवाईक , मित्र परिवार यांचे ग्रुप सोशल मिडीयावर काढले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ते संवाद साधत आहेत. लॉकडाऊन हे चालक -वाहकांसाठी कौटुंबिक संमेलनच ठरत आहे. कुटुंबातील सदस्या सोबत एकत्र येवून खेळ खेळणे, छंद जोपासणे,जेवणकरून घरातील कामे करण्यात वेळ घालवत आहेत.
सुट्टी किंवा रजा असली तरी कधी साहेबांचा फोन येईल यांचे टेन्शन असायचे. घराच्या सोबत एकत्र येवून दिवस घालवण्यासाठी फारसा वेळ मिळतच नव्हता. खूप दिवसांनी मुलांच्या सोबत गप्पा मारणे, खेळणे यात दिवस जात आहेत.
- कुलदिप हिरवे,
चालक
नोकरी निमित्त कधी पहाटे लवकर उठावे लागत होते. मात्र आता निवांत उठणे होते. घराच्या सोबत टिव्हीवरील जुन्या मालिका पाहणे, टिव्ही पाहताना मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे यामध्ये दिवस जात आहे. गेली सतरा वर्षापासून मी नोकरीला आहे इतका वेळ कधीच कुटूंबाला देता आला नव्हता.
हेमंत काशीद, वाहक
कामामुळे घरातील प्रत्येकाच्या जाण्या- येण्याच्या वेळा वेगळ्या असतात. रोज एकमेकांसमोर असलो तरी खूप गप्पा होत नव्हता, मात्र आता आम्ही घरीच असल्याने मनसोक्त गप्पा होत आहेत. तसेच घरातील अनेक कामे झाली आहेत.
वैशाली पाटील, वाहक