कमर्शिअल बँक कर्मचाऱ्यांतर्फे कोविड सेंटरला फॅन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:57+5:302021-06-22T04:16:57+5:30
कोल्हापूर : येथील कमर्शिअल को-ऑप. बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी १७ स्टॅण्ड फॅन देण्यात आले. या ...
कोल्हापूर : येथील कमर्शिअल को-ऑप. बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी १७ स्टॅण्ड फॅन देण्यात आले. या साहित्याचा बँकेचे अध्यक्ष गौतम जाधव यांच्या हस्ते उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी स्वीकार केला.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेस वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन ही मदत करण्यात आली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, बँकेचे सीईओ अनिल नागराज, सहायक व्यवस्थापक पद्माकर जवळकर, शाखाधिकारी दत्ताजीराव साळोंखे, संताजी शिंदे, पी. जे. घाटगे, दीपक चव्हाण, राजेश पाटील, अर्जुन पाटील, कुणाल बोडके उपस्थित होते.
-प्रगती हार्डवेअरतर्फे औषधे भेट-
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी प्रगती हार्डवेअर स्टोअर्स यांच्याकडून औषधे देण्यात आली. ही औषधे अशोक पटेल यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली. सुमारे ३० हजार रुपयांची औषधे दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी उपमहापौर संजय मोहिते, उपआयुक्त निखिल मोरे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, परवाना अधीक्षक राम काटकर, जयंती पटेल, मनीष पटेल, यग्मेश पटेल उपस्थित होते.