(सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर विमानसेवेची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:53+5:302020-12-28T04:13:53+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिलमध्ये देशांतर्गत विमानसेवा स्थगित झाल्याने कोल्हापूरची विमानसेवाही थांबली. त्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथील ...

(Farewell to last year): After the lockdown was relaxed, the airline flew | (सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर विमानसेवेची भरारी

(सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर विमानसेवेची भरारी

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिलमध्ये देशांतर्गत विमानसेवा स्थगित झाल्याने कोल्हापूरची विमानसेवाही थांबली. त्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर येथील विमानसेवा पुन्हा सुरू झाली. जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन झाल्याने प्रवासी संख्या घटली. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ती टप्प्याटप्प्याने वाढत गेली. कोल्हापूर-तिरूपती, हैदराबाद, बंगलोर, मुंबई या मार्गावर दिनांक २ सप्टेंबरपर्यंत ५८० विमानफेऱ्यांच्या माध्यमातून १६,४२५ जणांनी प्रवास केला. सध्या तिरूपती मार्गावरील विमानसेवा स्थगित आहे.

- कोरोनामुळे नागरी हवाई मंत्रालयाकडून कोल्हापूरची विमानसेवा स्थगित (१७ मे)

- हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरील सेवा सुरू (२५ मे)

- हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील सेवा सुरू (१२ जून)

- कोल्हापूरमधील लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या घटली (२० जुलै)

- १०१ दिवसात ५८० फेऱ्यांव्दारे १६,४२५ जणांनी प्रवास केला. (२ सप्टेंबर)

- मुंबई - कोल्हापूर विमानसेवा पूर्ववत सुरू (२७ ऑक्टोबर)

Web Title: (Farewell to last year): After the lockdown was relaxed, the airline flew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.