(सरत्या वर्षाला निरोप..) लॉकडाऊनमध्येही सहकाराने शेतकऱ्यांना तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:29+5:302020-12-28T04:13:29+5:30
काेल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना सहकारातील बहुतांशी संस्थांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे एकीकडे जग थांबल्याने ...
काेल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना सहकारातील बहुतांशी संस्थांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे एकीकडे जग थांबल्याने अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना, सहकाराने शेतकऱ्यांना तारले. यामध्ये दूध व्यवसायाचा उल्लेख करावा लागेल. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी दूध उत्पादकांना दीडशे कोटी रूपये दूध फरकाच्या माध्यमातून हातात पडले. त्यामुळे या व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके काहीशी फिरत राहिली. सर्वसाधारण सभा न झाल्याने सभासदांना लाभांशासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागली.
यावर झाला परिणाम...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ
सर्वसाधारण सभा लांबणीवर
सभा पुढे गेल्याने लाभांश वाटप थांबले
सहकारातच नोकऱ्या टिकल्या
लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचा रोजगार गेला. छोटे, मोठे उद्योगातून हजारो तरूण बेरोजगार झाले. मात्र एकमेव सहकारी संस्थांत नोकर कपात झाली नाही.
- राजाराम लोंढे