(सरत्या वर्षाला निरोप -जगणे कुलुप बंद) एस. टी.ची चाके थांबली उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:36+5:302020-12-28T04:13:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे देशभरात सर्वत्र लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच स्तरावरील वाहतूक, व्यवसाय, उद्योग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे देशभरात सर्वत्र लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच स्तरावरील वाहतूक, व्यवसाय, उद्योग तीन महिने बंद ठेवण्यात आले होते. त्याचा फटका कोल्हापूर एस. टी. विभागासही बसला.
कोरोनाच्या कहरापूर्वी या विभागातून रोज ७५० हून अधिक बसेस जिल्ह्यासह राज्यभरात २ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास करीत होत्या. त्यातून विभागास ७० लाखांचा महसूल जमा होत असे. मात्र, लाॅकडाऊनच्या काळात ६३ कोटींचा फटका बसला. अनलाॅकनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. या विभागातून जिल्ह्यासह राज्यभरात ५७० बसेस धावत असून, त्यांच्याकडून २ लाख १० किलोमीटर अंतर पार केले जात आहे. त्यातून दिवसाकाठी ५० लाखांचा महसूल गोळा होऊ लागला आहे.