(सरत्या वर्षाला निरोप-जगणे कुलुपबंद)... कुस्ती आखाडा डावाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:42+5:302020-12-28T04:13:42+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीत एकही स्पर्धा रंगली नाही. त्यामुळे राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील लाल मातीचा ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीत एकही स्पर्धा रंगली नाही. त्यामुळे राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील लाल मातीचा आखाडा डावाविनाच मोकळा राहिला.
- दरवर्षी महापौर चषक, डाॅ. डी. वाय. पाटील चषक, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, वारणेची आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल, बानगेचे मैदान, मुरगूडचे मानाचे मैदान अशा स्पर्धा रद्द झाल्या.
- मोतिबाग , न्यू मोतिबाग, काळाईमाम, जयभवानी शाहूपुरी, शाहू विजयी गंगावेश तालीम, शाहू आखाडा, राष्ट्रकुल आखाड्यांसह जिल्ह्यातील विविध तालीम, आखाडे मल्लांविना सुनेसुने राहिले.
- दोन हजारांहून मल्लांना घरीच सराव करावा लागला.
- कुस्तीवर निर्भर असणारे वस्ताद, प्रशिक्षक, माॅलिशवाले, शिष्यवृत्तीधारक मल्लांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.
- महाराष्ट्र केसरीसह राज्य,राष्ट्रीय स्पर्धांसह सर्वच स्पर्धा रखडल्या.
- १४, १६,१८, १९ व २१ वर्षाखालील मल्लांना या वयोगटात खेळण्याची संधी पुन्हा मिळणार नाही.