(सरत्या वर्षाला निरोप) : विविध व्यवसायांचे ‘शटर डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:52+5:302020-12-29T04:22:52+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील बांधकाम, हॉटेलसह कापड, फर्निचर, वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या विक्री व्यवसायांची ‘शटर डाऊन’ राहिली. कोरोना काळात या ...
कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील बांधकाम, हॉटेलसह कापड, फर्निचर, वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या विक्री व्यवसायांची ‘शटर डाऊन’ राहिली. कोरोना काळात या व्यवसायांना सुमारे ६,१०० कोटींचा फटका बसला. या क्षेत्रात रोजगार करणाऱ्यांची मोठी अडचण झाली. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायासमोरील अडचणी पुन्हा वाढल्या. कोरोनामुळे दिनांक २४ मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, नाष्टा सेंटर बंद झाली, ती ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने सुरू झाली.
- आता रात्री ११ नंतरच्या संचारबंदीमुळे पुन्हा हॉटेल व्यवसायाची गती मंदावली.
- हॉटेल आणि पर्यटन क्षेत्राचे सुमारे ४५० कोटींचे नुकसान.
- बांधकाम क्षेत्राला सुमारे १५० कोटींचा फटका बसला.
- विविध व्यापार, व्यवसायांची कोरोना कालावधीत ५,५०० कोटींची उलाढाल ठप्प झाली.
- दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम, विविध व्यापार, व्यवसायांनी गती घेतली. त्यामुळे या क्षेत्रातील उलाढाल वाढली.