शेतमाल सडतोय 'शेतातच', लाॅकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:32+5:302021-04-24T04:23:32+5:30

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच ...

Farm rotting 'in the field', hit by lockdown | शेतमाल सडतोय 'शेतातच', लाॅकडाऊनचा फटका

शेतमाल सडतोय 'शेतातच', लाॅकडाऊनचा फटका

googlenewsNext

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच झालेला नाही. त्यामुळे हे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, तर हा नाशिवंत माल असल्याने याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी किमतीत मागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. याबाबत ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा हेच लॉकडाऊन शेतकऱ्यांची आर्थिक साखळी विसकटायला कारणीभूत ठरणार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.

बानगे (ता.कागल) येथिल कलिंगड उत्पादक शेतकरी विजय सुभाष चव्हाण यांनी चार वर्षांपासून कलिंगडसह वांगी, भेंडी आदी भाजीपाला पिके घेतली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी कलिंगड अगदी विनामूल्य देण्याची वेळ आली, तर यंदाही तीच स्थिती आहे.

गत महिन्यात दीड एकरातील कलिंगड अत्यल्प दरात दिले. आता अडीच एकरातील कलिंगड काढणीवर आले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी लाँकडाऊनचे कारण सांगून मालाची उचलच केलेली नाही. त्यामुळे हा माल शेतातच सडत पडला आहे.

रोपाची किंमत तीन आणि कलिंगडची चार..

लाॅकडाऊनमुळे मागणी कमी झाली असल्याचे सांगत व्यापारी चार रुपयांनी प्रतिकिलो कलिंगड मागत आहेत; परंतु एका रोपाची किंमतच ३ रुपये आहे. खते, औषधे, ठिबक यासह एकूण एकरी ७५ हजार खर्च येत आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फिटणार कसे, या विवंचनेत आहे. शेतकऱ्यांबाबत शासनाचे धोरणच नसल्याचे सांगत विजय चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लारूकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच पूर्वानुभवावरून यंदा अगोदर शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करा. मगच लाॅकडाऊन करा, असे बजावले होते. शासनाने गांभीर्याने घेऊन शेतमालाची विक्री व्यवस्था करावी किंवा पंचनामे करून त्यांना जागेवरच नुकसान भरपाईचा धनादेश द्यावा. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.

-सागर कोंडेकर

जिल्हा उपाध्यक्ष युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना

कॅप्शन

बानगे येथील विजय चव्हाण यांनी कलिंगड काढून असा ढीग केला आहे. व्यापारी न आल्याने ताडपदरी, नारळीच्या पानांनी झाकले आहेत.

छाया-दत्तात्रय पाटील

Web Title: Farm rotting 'in the field', hit by lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.