शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला धडकी भरेल--शेट्टी यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:47 PM2017-09-22T22:47:17+5:302017-09-22T22:52:07+5:30
\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,
पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले,‘नंजूम गौडा, नारायण स्वामी, शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत यांच्या उंचीचे देशात शेतकरी नेते आता राहिले नाहीत; परंतु शेतकºयांचे प्रश्न मात्र बिकट झाले आहेत. शेतकºयांबरोबरच शेतकºयांची मुलं-बाळेही आत्महत्या करू लागले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकºयांनी आणि शेतकरी नेत्यांनी एक होणे ही काळाची गरज आहे. मोदींच्या विश्वासघाताने शेतकरी पेटून उठला आहे तर शिवराजसिंह चौहान सरकारने सहा शेतकºयांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी नेते एक झाले आहेत आणि त्यातूनच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय झाला. देशाच्या कानाकोपºयातील शेतकºयांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे.’
या देशातला शेतकºयांमध्ये भिकाºयाला राजा करण्याची जशी ताकत आहे तशीच राजाला भिकारी करण्याचीही ताकत आहे हे कोणी विसरू नये. आपली लढाई ही कौरवांच्या विरोधातली आहे म्हणूनच येत्या २० नोव्हेंबरला कुरूक्षेत्राला म्हणजेच दिल्लीला देशाच्या कानाकोपºयांतून शेतकरी निर्णायक लढ्यासाठी जमणार आहेत. कर्नाटकला शेतकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे तेव्हा कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने आपली ताकद दिल्लीत दाखवा, असेही आवाहन खा. शेट्टी यांनी केले.
कर्नाटकातील पांडवपुरा येथील किसान सभेत हजारो शेतकºयांसमोर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी.