क्षीरसागर कोल्हापूरात राहतात, शक्तीपिठास शेतकऱ्यांचा विरोधच; हसन मुश्रीफ यांनी ठणकावले
By राजाराम लोंढे | Updated: February 10, 2025 22:54 IST2025-02-10T22:51:51+5:302025-02-10T22:54:06+5:30
अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही

क्षीरसागर कोल्हापूरात राहतात, शक्तीपिठास शेतकऱ्यांचा विरोधच; हसन मुश्रीफ यांनी ठणकावले
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, हे आपण आधीच सांगितले आहे. त्यामुळे आधी जो लेआऊट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत, या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावले.
शक्ती महामार्गाबाबत शेतकऱ्यांचा गैरसमज असल्याने सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘क्रिडाई’ सोबतच्या बैठकीत सांगितले. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध असल्याने संबधित अधिसूचना रद्द केेलेली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितले आहे. याबाबत, मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना चर्चा झाली आहे. राज्य शासनाचा आक्षेप नसल्याचे पत्र आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे असेल तर आजच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही.