विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:35+5:302021-06-05T04:17:35+5:30

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, ...

Farmers demand installation of electric poles | विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

Next

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, विरळे गावांतील विद्युत खांब वादकाने पडले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी बंद आहेत. शेतकरी महावितरण कंपनीच्या शाहूवाडी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. शेतकऱ्यांना लाईट नसून वीज बिल भरावे लागत आहे. महावितरणच्या कार्यालयात शेतकरी चौकशी साठी गेले असता काम ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. वीज बिलाबरोबर शेतीचे अर्थिक नुकसान करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अधिकारी ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

Web Title: Farmers demand installation of electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.