चित्रनगरीच्या ‘कुंपणाने’च शेत खाल्ले!

By admin | Published: September 13, 2014 12:32 AM2014-09-13T00:32:26+5:302014-09-13T00:34:09+5:30

बांधलेल्या कंपौंडसाठी पुन्हा चार कोटींची निविदा : विकासात्मक विस्तार होणार तरी कधी?

Farmer's 'fencing' farm ate! | चित्रनगरीच्या ‘कुंपणाने’च शेत खाल्ले!

चित्रनगरीच्या ‘कुंपणाने’च शेत खाल्ले!

Next

इंदूमती गणेश ल्ल कोल्हापूर
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देणारा आशेचा किरण असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीभोवती बांधण्यात आलेल्या कंपौंडवर पुन्हा एकदा चार कोटी १२ लाखांचा चुराडा करण्यात येणार आहे. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात तीन कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या कंपौंडसाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एवढ्या रकमेत चित्रनगरीचे सगळे लोकेशन तयार होऊन चित्रीकरणाला प्रारंभ होईल. हे म्हणजे भूत बंगला झालेल्या इमारतीच्या टाळूवरचे लोणीच खाण्याचा प्रकार आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने सन २०११-१२ साली दहा कोटींची तरतूद केली होती.
चित्रनगरी विकसित झाल्यानंतर येथे चित्रीकरणासाठी अत्याधुनिक प्रकारचे कॅमेरे, लाईट्स असे चित्रीकरणाचे सामान आणले जाईल. या सामानांच्या सुरक्षिततेसाठी आणि चित्रनगरीची हद्द अबाधित राखण्यासाठी कंपौंड होणे गरजेचे होते.
त्यानुसार एप्रिल-मे २०१२ साली चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसराची मोजणी करण्यात आली आणि लगेचच कंपौंडचे काम सुरूझाले.
चित्रनगरीच्या ७७ एकर माळरानाभोवती दगडी कंपौंड करण्यात आले. सध्यस्थितीत कंपौंडचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. याच परिसरात कृत्रिम विहीरही करण्यात येणार असल्याने थोड्या परिसरात कंपौंड बांधलेले नाही, एवढेच काय ते उर्वरीत काम, असे असताना आज, शुक्रवारी पुन्हा व्यवस्थापकीय संचालक कोल्हापूर चित्रनगरीे यांच्यावतीने कंपौंडसाठी चार कोटी १२ लाख ६१ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात मौजे मोरेवाडी (ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर) येथील चित्रनगरीच्या जागेभोवती (सर्वे क्रमांक ६४ व ६५) संरक्षक भिंत बांधणे टप्पा-२ असे जाहीर करण्यात आले आहे. यासाठीच्या निविदा स्वीकारण्यची अंतिम तारीख १५ आॅक्टोबर देण्यात आली आहे.
यामुळे चित्रनगरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, असे म्हणावे लागेल.

Web Title: Farmer's 'fencing' farm ate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.