करवीर तालुक्यात बीट उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:39+5:302021-04-07T04:26:39+5:30
सावरवाडी : उसाची उचल वेळेत होत नसल्याने ऊस पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. उसाला पर्यायी पीक म्हणून ...
सावरवाडी : उसाची उचल वेळेत होत नसल्याने ऊस पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. उसाला पर्यायी पीक म्हणून करवीर तालुक्यात बीट पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
शेतीमध्ये ऊस लावणी क्षेत्रात डिसेंबर महिन्यात बीट पिकाची पेरणी करण्यात आली. बीट पिकाला बाजारपेठेत मागणी वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोजच्या जेवणात बीटचा वापर होऊ लागला. ग्रामीण बाजारपेठेत बीट पिकाला मागणी वाढत असून, दहा रुपयेप्रमाणे एका बीटची विक्री होऊ लागली आहे
शेतीमध्ये अंतरपीक म्हणून मका पिकाऐवजी बीट पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. चार महिन्यांचे अंतरपीक म्हणून बीट लागवड केली जात आहे. पुणे, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या बाजारपेठेत बिटाची निर्यात होऊ लागली आहे.
फोटो ओळ
उसाला पर्यायी पीक म्हणून करवीर तालुक्यात अंतरपीक म्हणून बीट पिकाच्या उत्पादनाकडे कल वाढू लागला आहे.