कुशिरे येथील शेतकऱ्यांचा नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:37+5:302021-07-15T04:18:37+5:30

परंतु अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हरकती घेण्यास पंधरा दिवसांचा वेळ देतो, असे सांगून पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू ठेवले. कुशिरे येथील ...

Farmers in Kushire oppose drawing of Nagpur-Ratnagiri highway | कुशिरे येथील शेतकऱ्यांचा नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनास विरोध

कुशिरे येथील शेतकऱ्यांचा नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनास विरोध

Next

परंतु अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हरकती घेण्यास पंधरा दिवसांचा वेळ देतो, असे सांगून पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू ठेवले.

कुशिरे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, कुशिरे तर्फ ठाणे व निगवे दुमाला या दोन गावांच्या मधून पाणंद रस्ता आहे. तो पाणंद रस्ता सेंटर धरुन शंभर फूट कुशिरेच्या हद्दीत व शंभर फूट निगवे गावाच्या हद्दीतून मापे टाकून रस्ता करण्यात यावा. पण सध्या नवीन आलेला प्लॅन व कंपनीचे लोक जी अलायमेंट दाखवत आहेत, ती अलायमेंट व प्लॅन पूर्ण चुकीचा आहे. तो प्लॅन कुशिरे येथील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बरीचशी कुटुंबे व घरे उद्ध्वस्त होणार आहेत. कुशिरे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असे काम अधिकाऱ्यांनी करू नये अन्यथा आम्ही सर्व शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कुशिरे येथील शेतकऱ्यांनी दिला.

फोटो ओळ

कुशिरे (ता. पन्हाळा) येथील शेतकरी नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकन प्रक्रियेला विरोध दर्शविताना.

-

Web Title: Farmers in Kushire oppose drawing of Nagpur-Ratnagiri highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.