आता शेतकºयांची ‘दिल्ली’वर धडक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:18 PM2017-11-06T23:18:11+5:302017-11-06T23:21:20+5:30
जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या
जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या महामोर्चासाठी कोल्हापूर-दिल्ली खास रेल्वे गाडीची व्यवस्था केलेली आहे. दि. १८ नोव्हेंबरला कोल्हापुरातून शेतकºयांची खास रेल्वे सुटणार आहे.
अखिल भारतीय किसान मुक्ती मोर्चाच्यावतीने दि. २० व २१ नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतरवर किसान संसद भरविण्यात येणार आहे. देशातील १८० संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाºया किसान मुक्ती मोर्चास देशभरातील
१० लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महाराष्टÑातील जास्तीत जास्त शेतकºयानी सहभागी व्हावे, यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी कोल्हापूर ते दिल्ली अशी खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दबावगट निर्माण केल्याची माहिती खाभिमानी शेतकरी संघटनेने दिली. खासदार राजू शेट्टींचे नेतृत्व आता दिल्लीला धडकणार असून, जवळपास सर्वच राज्यातील दौरा आता पूर्ण होत आलेला आहे. २० नोव्हेंबरला देशव्यापी शेतकºयांच्या संघटना एकत्रित येणार असून, या किसान संसदेचे खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व करीत असल्याने शेट्टी यांनी दिल्लीत दबावगट निर्माण केला आहे.