कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा नादच खूळा! पत्रिका छापून म्हैशीच्या डोहाळे जेवणाचे गावाला दिलं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 02:14 PM2022-11-07T14:14:30+5:302022-11-07T14:14:50+5:30

सोनी या म्हैशीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून घालून छान नटवण्यात आले.

Farmers of Chimane in Ajra taluka printed leaflets inviting the village to eat buffalo meat | कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा नादच खूळा! पत्रिका छापून म्हैशीच्या डोहाळे जेवणाचे गावाला दिलं निमंत्रण

कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा नादच खूळा! पत्रिका छापून म्हैशीच्या डोहाळे जेवणाचे गावाला दिलं निमंत्रण

googlenewsNext

रवींद्र येसादे

भादवण : तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण आजरा तालुक्यातील चिमणे येथे डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका म्हैशीच्या डोहाळे जेवणाची… खरं वाटत नाही ना? पण हे खरंय. एका शेतकऱ्याने पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या आपल्या म्हैशीचे डोहाळे जेवण घालत गावाला निमंत्रण दिले. यासाठी त्यांनी चक्क पत्रिका वाटून गावकऱ्यांसह पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.

चिमणे येथील समीर आत्माराम नादवडेकर व सीमा समीर नादवडेकर यां शेतकरी कुटूंबाने आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या सोनी या म्हैशीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी ५०० पत्रिका छापून लोकांना आमंत्रित केलं. डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटनं आलंच. सोनी या म्हैशीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून घालून छान नटवण्यात आले.

गावातल्या आया-बाया डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी नादवडेकर यांच्या घरी जमा झाल्या. सोनीला मंडपात बांधण्यात आलं. २५० महिलांनी सोनीची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर पाच प्रकारची फळे, सुग्रास पेंड, कडधान्ये, गवत सोनीला खाऊ घालण्यात आले.

स्वतःच्या मुलांप्रमाणेच नादवडेकर दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात. नादवडेकर कुटूंबियांना आई - वडील, भाऊ व मुले यांची चांगली साथ मिळाली. मायेपोटी चक्क डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गाव जेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.

सोनीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी, नातेवाईकानी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. नादवडेकर दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला आनंद द्विगुणित केला.

देखण्या स्पर्धेत प्रथम क्रमांक

गडहिंग्लज देखणी रेडी स्पर्धा भरवण्यात आली होती . यावेळी ८६ रेडी मध्ये सोनीने प्रथम क्रमांक मिळवला होता. सोनी रेडीच्या हौसे पोटी तिचे डोहाळ जेवण करून गावकरी व नातेवाईकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. यातून पशुधना बाबत ग्रामस्थांना प्रेरणा मिळेल असे मत समीर नादवडेकर यांनी व्यक्त केले

Web Title: Farmers of Chimane in Ajra taluka printed leaflets inviting the village to eat buffalo meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.