कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकरी संघटनांची आज बेळगावात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:06 PM2018-11-19T12:06:40+5:302018-11-19T12:09:25+5:30

महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील साखर कारखानदारांनीही ऊसाला एफआरपी+२०० असा  दर दयावा, अशी मागणी स्वाभिमानीसह कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी केली अाहे.

Farmers' organizations including Karnataka Chief Ministers today meet in Belgaum: - The question of Ustad, North Karnataka, FRP + 200 | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकरी संघटनांची आज बेळगावात बैठक

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकरी संघटनांची आज बेळगावात बैठक

Next
ठळक मुद्देअशी माहिती 'स्वाभिमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गडयान्न‍ावर यांनी  येथील पत्रकार परिषदेत दिली.चंदगड तालुक्यातील जास्तीतजास्त ऊस हा कर्नाटकातील हुदली, शिवशक्ती आदी क‍ारखान्यांना पाठवला :उत्तर कर्नाटकातील ऊसदराचा प्रश्न, एफआरपी + २०० ची मागणी

गडहिंग्लज :  महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील साखर कारखानदारांनीही ऊसाला एफआरपी+२०० असा  दर दयावा, अशी मागणी स्वाभिमानीसह कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी केली अाहे.त्यासंदर्भातील चर्चेसाठी सोमवार( दि. १९ )रोजी बेळगाव येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत बैठकीचे होणार आहे, अशी माहिती 'स्वाभिमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गडयान्न‍ावर यांनी  येथील पत्रकार परिषदेत दिली.
       

  गडयान्नावर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊसाची रिकव्हरी आहे त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकातील ऊसाची रिकव्हरी चांगली आहे. परंतु तेथील कारखानदारही ऊस उत्पादकांचे शोषण करीत अाहेत. महाराष्ट्रातील ऊसदराच्या अांदोलनामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे.त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
       

कर्नाटकातील बेडकिहाळ, मुधोळ, निपाणी, नणदी, अथणी, हुदली, बागलकोट, जमखंडी अादी सीमाभागातील कारखान्यांमधुन दररोज १ लाख ४० हजार टनाचे गाळप होते. त्या कारखान्यांना महाराष्ट्रातील कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातील सीमेवरील ऊस  मोठ्या प्रमाणात  जातो.
   

चंदगड तालुक्यातील जास्तीतजास्त ऊस हा कर्नाटकातील हुदली, शिवशक्ती आदी क‍ारखान्यांना पाठवला जातो.त्यामुळे कर्नाटकासह महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्नाटकातील कारखान्याना ऊस पाठवला आहे त्यांनाही योग्य एफआरपी+२०० असा दर मिळालाच पाहिज. यासाठी स्वाभिमानी संघटना व रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली  सीमाभागातील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखविण्याची गरज आहे.

   
गेल्या गळीत हंगामातील १०० कोटींच्या थकीत ऊसबीलासह चालु गळीत हंगामात एफअारपी+२०० दर दयावा अशी मागणी या बैठकीत करणार आहोत. बेळगाव येथील विधानसौध येथे होणार्‍या बैठकीसाठी  कर्नाटकासह महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  
यावेळी आण्णासाहेब पाटील, बसवराज मुत्नाळे, सागर ग्वाडी, बसवराज संभाजी, दौलतराव देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers' organizations including Karnataka Chief Ministers today meet in Belgaum: - The question of Ustad, North Karnataka, FRP + 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.