बेळगाव सुवर्णसौधमध्ये शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट; १० अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:13 PM2018-11-18T23:13:51+5:302018-11-18T23:14:04+5:30
बेळगाव : थकीत ऊसबिल देण्याच्या मागणीसाठी रविवारी उसाचे ट्रक्टर हलगा येथील सुवर्णसौधमध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकºयांची पोलिसांबरोबर झटापट झाली. ...
बेळगाव : थकीत ऊसबिल देण्याच्या मागणीसाठी रविवारी उसाचे ट्रक्टर हलगा येथील सुवर्णसौधमध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकºयांची पोलिसांबरोबर झटापट झाली. या झटापटीत एक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी १० शेतकºयांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी उसाचे पाच ट्रक्टर ट्रॉलीसह सुवर्णसौधमध्ये घुसविले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागील वर्षाच्या उसाच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करून सोमवारी बेळगावला येऊन समक्ष चर्चा करून ऊसबिलाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, रविवारी मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या शेतकºयांना मंगळवारी बंगलोरला चर्चेसाठी बोलाविले. त्यामुळे दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत शेतकºयांनी हे आंदोलन केले.
रविवारी सकाळी आंदोलक शेतकरी एकत्र जमले. त्यांनी सुवर्णसौध गाठून उसाचे पाच ट्रक्टर ट्रॉलीसह गेटच्या आत नेत ऊस खाली टाकून आंदोलनास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर घटनास्थळी दाखल झाले.
ट्रक्टर बाजूला करून आंदोलक शेतकºयांना ताब्यात घेतले. आंदोलक शेतकºयांना ताब्यात घेत असताना अशोक यमकनमर्डी हे शेतकरी जखमी झाले. पोलिसांनी तीसहून अधिक आंदोलक शेतकºयांना हिरेबागेवाडी पोलिसांत स्थानबद्ध केले होते. सायंकाळी पोलिसांनी दहा शेतकºयांवर गुन्हा नोंदवून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.