हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग सर्व्हेला विरोध शेतकऱ्यांना अटकाव : हातकणंगले, कबनूर, कोरोचीतील शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:13 AM2018-08-30T01:13:20+5:302018-08-30T01:13:35+5:30
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बुधवारी हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वेमार्गाचा सर्व्हे मोठ्या पोलीस फौजफाट्यामध्ये सुरू झाला. रेल्वेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. जैन
हातकणंगले : शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बुधवारी हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वेमार्गाचा सर्व्हे मोठ्या पोलीस फौजफाट्यामध्ये सुरू झाला. रेल्वेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. जैन (मिरज) आणि कबनूर, कोरोची, चंदूर आणि हातकणंगले येथील शेतकरी प्रतिनिधी यांची दुपारी तीन वाजेपर्यंत चाललेली चर्चा निष्फळ ठरली. पोलिसांनी रेल्वे स्थानकच्या बाहेरच शेतकºयांना अटकाव करून प्रतिबंधात्मक १४९ च्या नोटिसा लागू केल्याने रेल्वे अधिकाºयांनी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली.
हातकणंगले ते इचलकरंजी या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी बुधवारी हातकणंगले येथून सुरुवात झाली. रेल्वे सर्वेक्षणाबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना व माहिती देण्यात आली नव्हती तरीही सकाळी ११ वाजता कबनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन पी. एम. पाटील, प्रमोद पाटील माजी पंचायत समिती सदस्य, कोरोची गावचे शरद साखर कारखान्याचे संचालक दशरथ पिष्टे, चंदूरचे नागेश पुजारी, हातकणंगलेचे गुंडा इरकर यांच्यासह दोनशेच्या वर शेतकरी हातकणंगले रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले. शेतकºयांपेक्षा पोलिसांची संख्या मोठी असल्यामुळे शेतकरी हतबल झाले.
रेल्वे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी शेतकरी नेते आणि रेल्वेचे अधिकारी एस. के. जैन यांच्यामध्ये हातकणंगले रेल्वे स्थानकाबाहेर चर्चा घडवून आणली. यामध्ये दशरथ पिष्टे, प्रमोद पाटील, जयकुमार कोले यांच्यासह इतर शेतकरी प्रतिनिधींनी हे रेल्वे सर्वेक्षण चुकीचे आहे. कºहाड ते बेळगाव रेल्वेचे यापूर्वी सर्वेक्षण रेल्वे विभागाने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग चारला समांतर असे केले आहे, तसेच वाहतूक मंत्रालयाकडूनही वेगळे सर्वेक्षण केले आहे.
यापूर्वी दोन झालेले सर्व्हे रद्द करून आता नव्याने सर्वेक्षण करून शेतकºयांवर अन्याय सुरू असल्याच्या भावना व्यक्त करून इचलकरंजी शहरासाठी हातकणंगले येथून रेल्वे मार्ग आठ किलोमीटर पडतो जर रेल्वेने तारदाळ फाट्यापासून इचलकरंजीला रेल्वे नेली तर हेच अंतर तीन किलोमीटर होते, असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे अधिकारी सर्व्हेवर ठाम राहिले.
हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील औद्योगिक वसाहती, इंजिनिरिंग असोसिएशनने विरोध केला आहे. परिसरातील बागायत शेती या रेल्वे मार्गामध्ये जाणार असल्याने शेतकºयांनी विरोध केला आहे. रेल्वे मार्गावर पंचगंगा नदीवर पूल होणार असून, या पुलाच्या भरावामुळे हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली जाणार आहे. रुकडीपासून रुईपर्यंत पंचगंगा नदीच्या पुराचा पाण्याचा फुगवटा या रेल्वे पुलामुळे निर्माण होणार असल्याचे सर्व मुद्दे शेतकरी नेत्यांनी रेल्वे अधिकाºयांना पटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिकारी सर्वेक्षणावर ठामच राहिले.
शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांच्यामधील चर्चा निष्फळ ठरली आणि दुपारी तीन वाजता रेल्वे सर्वेक्षणाला सुरुवात झाली. पुढील चार दिवस हा सर्व्हे सुरूच राहणार असल्याचे एस. के. जैन यांनी स्पष्ट केले.
सर्वेक्षण बंद पाडू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले यांनी यावेळी खासदार आणि आमदारांची बैठक घेऊन सुरू असलेले सर्वेक्षण बंद पाडण्याचा इशारा दिला.
पीएमओ आॅफिसकडून दबाव
रेल्वेचे अधिकारी एस. के. जैन यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रामधील दोन रेल्वेलाईन तत्काळ सर्वेक्षणासाठी हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये या रेल्वे मार्गाचा समावेश असून, पी.एम.ओ. आॅफिसकडून गेली सहा महिने दबाव आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर दीड वर्षांत शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहणासाठी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले.
जनहित याचिका दाखल करणार
इचलकरंजी : रेल्वे प्रशासनाने हातकणंगले-इचलकरंजी या रेल्वेमार्गाचा सर्व्हे बळाचा वापर करून सुरू केला आहे. यासंदर्भात यापूर्वीही अनेकवेळा शेतकºयांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय रेल्वेविरोधी कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
पंचगंगा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या मार्गावरील सर्व गावांसह पुराचा फटका बसणाºया गावांमध्येही गावसभा घेऊन त्यामध्ये रेल्वेसाठी विरोध असल्याचा ठराव करून दिला आहे, तरीही सरकार बळाचा वापर करीत सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हेला विरोध करताना शेतकºयांना तेथून हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे शेतकºयांनी रेल्वेविरोधी कृती समितीसह कारखान्यावर बैठक घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पी. एम. पाटील, जयकुमार कोले, नागेश पुजारी, आदी उपस्थित होते.