सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:59 AM2019-06-18T01:59:13+5:302019-06-18T01:59:51+5:30

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या

 Farmers: - Raju Shetty | सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा, १ जुलैला महावितरणवर मोर्चा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहे. माझा पराभव झाला म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. मी चळवळीतील लढणारा कार्यकर्ता आहे.

भविष्यात शेतकºयांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व ताकदीने संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते.
वाढीव वीज बिल व वीज जोडणी या मागणीसाठी येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी कोल्हापूर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले.

यावेळी वाशिम जिल्ह्यातून ५४० किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या अ‍ॅड. भागवत नरवाडे यांच्यासह मनोज शिरभाऊ व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जनावरांना चारा व शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणी प्रश्नावर सरकार बोलत नाही. निर्ढावलेल्या सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकार पाण्याचे राजकारण करीत आहे. त्याची बारामतीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात गावागावांतील संघटन मजबूत करून पाण्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, शैलेश चौगुले, वसंतराव पाटील, पद्माराणी पाटील, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एफआरपी थकविणारे भाजपचेच कारखाने
मी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतो, असा आरोप केला जात आहे. राज्यात भाजपच्याच साखर कारखान्यांनी एफआरपी थकविलेली आहे. राज्यात एकूण १४५६ कोटी रुपयांची एफआरपी आजअखेर थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा विचार केल्यास पंधरा कारखान्यांचे २४४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दहा साखर कारखाने शिवेसना व भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यांच्याकडून १८९ कोटी रुपये एफआरपी थकविलेली आहे. मग यांची मांडी गेली कुठे ! सत्तेला चिकटावे तसे काही कारखानदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.


 

Web Title:  Farmers: - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.