शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध बंड करावे
By admin | Published: January 14, 2016 10:04 PM2016-01-14T22:04:42+5:302016-01-15T00:28:49+5:30
टी. एल. पाटील : म्हाकवे येथील सत्संग व्याख्यानमाला
म्हाकवे : शिक्षण कर, ऊस खरेदी कर शेतफाळा, विविध माध्यमातून शेतकरी कर भरतो; मात्र संवेदनशून्य राज्यकर्त्यांकडून विनासंघर्ष शेतकऱ्यांना काही मिळत नाही. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढाईला सज्ज व्हावे, अन्याय करणाऱ्यांपेक्षा सहन करणे हीच मोठी चूक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उज्ज्वल भविष्याचा मागोवा घेतला पाहिजे, असे मत प्रा. टी. एल. पाटील यांनी व्यक्त केले.म्हाकवे (ता. कागल) येथील सत्संग व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘सावध हो बळिराजा’ या विषयावर विचार मांडले.आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीपप्रज्वलन केले. बस्तवडे येथील संत सावंतामाळी व ऋणानुबंध ग्रुपच्या तरुणांनी धन्वंतरी पूजन केले. प्रमुख अतिथी म्हणून आणूर येथील भाऊ ग्रुप व इशारा तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. के. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सत्संगचे प्रमुख श्रीकांत पाटील, रामचंद्र पाटील, एकनाथ पाटील, तंटामुक्तचे बाबूराव पाटील, आर. एस. पाटील, पंढरीनाथ पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)