कृषी वीज बिल सवलत योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:37+5:302021-01-09T04:19:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोडोली : कृषी पंपाची थकीत वीज बिले लवकर भरल्यास विशेष सवलत देण्यात येईल, या योजनेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोडोली : कृषी पंपाची थकीत वीज बिले लवकर भरल्यास विशेष सवलत देण्यात येईल, या योजनेचा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोडोली येथील महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विनोद माने यांनी केले. काखे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कृषी वीज बिल सवलत योजनेत पहिल्या वर्षी सहभाग घेतल्यास बिलात ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के सवलत मिळणार आहे. ५ वर्षापूर्वीच्या थकबाकीवरील शंभर टक्के व्याज माफ व संपूर्ण दंड माफ करण्यात येणार आहे. ही योजना ३१ एप्रिल २०२४ पर्यन्त असल्याचे माने यानी सांगितले.
यावेळी काखे उपकेंद्राचे सहा. अभियंता श्री. पांडव, सरपंच दगडू पाटील, उपसरपंच संदीप पाटील आदी उपस्थित होते.