वीज बिलांबाबत शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:18+5:302021-03-20T04:22:18+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांची वीज बिले सक्तीने वसूल करू नये, वीजग्राहकांची वीज तोडू नये, या मागणीसाठी शाहूवाडी ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांची वीज बिले सक्तीने वसूल करू नये, वीजग्राहकांची वीज तोडू नये, या मागणीसाठी शाहूवाडी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी केले. गेले वर्षभर कोरोनामुळे दैनंदिन व्यवहार थंड आहेत. उत्पादनावर परिणाम झाला आहे. महागाई वाढत आहेत. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती व व्यावसायिकांची बिले माफ करावीत. ग्राहकांच्या सोयीप्रमाणे हप्त्याने बिले घ्यावीत. वीज कनेक्शन तोडू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज बिले सदोष नाहीत. नियमित रिडिंग बघून बिले दिलेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची वीज बिले हप्त्याने घ्यावीत. सर्व ग्राहकांना वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्यामराज यांना देण्यात आले. आंदोलनात भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, दस्तगीर आत्तार, गोपाळ पाटील, शिवाजी पाटील, गणेश गांधी, के. के. पाटील आदींसह शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्त उपस्थित होते.